काका निवडून आणण्यात तर पुतण्या पाडण्यात एक्स्पर्ट

अजित पवार यांचा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणा मध्ये अनेक ठिकाणी अंतिम मानला जातो. आणि हेच कारण आहे कि त्यांचे समर्थक नेहमी घोषणा देत असतात कि ‘एकच वाडा अजित दादा’. आणि याची प्रचिती पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात पाहण्यास मिळत आहे. महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री विजय शिवतारे हे कसे निवडून येतात हेच पाहतो असे विधान अजित पवार यांनी केलं होत. अगदी तसेच झालं देखील आहे. शिवसेने कडून उभे असलेले विजय शिवतारे यांना पराभव सहन करावा लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे कोणालाही निवडून आणतात असे अनेक लोक मानतात. तर अजित पवार कोणत्याही उमेदवाराचा पराभव घडवून आणू शकतात असे महाराष्ट्राच्या राजकारणात मानलं जात आहे. या काका-पुतण्याच्या जोडीची गोष्टच निराळी आहे. आपल्या सडेतोड बोलण्यामुळे दादा अनेक वेळा अडचणीत सापडले आहेत हे आपल्याला माहीत आहेच. पण तरीही त्यांनी आपली ही सवय बदलली नाही आहे.

अजित दादांनी आपल्या भाषणात म्हंटल होत कि आम्ही ठरवलं एखाद्याला आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला देखील एकत नाही. आम्ही म्हणतो बाबा, जाऊ द्या जाऊ द्या, तू आता 2019 मध्ये आमदार कसा होतो तेच पाहतो, असं अजित दादा म्हणाले होते. आणि झालं देखील अगदी तसेच विजय शिवतारे यांचा पराभव झाला.

तर दुसरीकडे काका म्हणजेच शरद पवार यांनी ठरवलं होत कि त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना सातारा लोकसभेच्या पॉट निवडणुकी मध्ये विजयी करायचे आणि शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना विजयी केलेच. त्यामुळे या काका आणि पुतण्याच्या जोडीला निवडून आणण्यात आणि पाडण्याची कला चांगलीच पारंगत झाली आहे असे वाटते.

आम्ही नेहमी आपल्या आवडीच्या पोस्ट मराठी गोल्ड फेसबुक पेज वर शेयर करत असतो. आपण आमचे पेज लाईक करून आमच्या पोस्ट दररोज वाचू शकता.