Breaking News

143 दिवसा पर्यंत शनी वक्री राहतील, सगळ्या राशीवर होणार याचा परिणाम

ज्योतिष शास्त्र अनुसार जेव्हा-जेव्हा शनी आपली चाल बदलतात तेव्हा-तेव्हा याचा व्यापक परिणाम सगळ्यावर पडतो. 11 मे पासून शनी जे न्याय आणि कर्म देवता आहेत उलटी चाल चालणार आहेत. ज्योतिष मध्ये या चालीला वक्री चाल म्हणतात. शनी मकर राशी मध्ये सरळ दिशे ने चालताना 11 मे सकाळी 9 वाजून 27 मिनिटांपासून वक्री होतील जेथे ते 29 सप्टेंबर सकाळ पर्यंत याच चालीत राहतील. यानंतर पुन्हा ते मार्गी होतील.

ज्योतिष शास्त्र अनुसार सगळ्या ग्रहा मध्ये शनी ची चाल सगळ्यात कमी वेगाची आहे. शनी एका राशी मधून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी जवळपास अडीच वर्ष वेळ घेतात. या पूर्वी 24 जानेवारी 2020 रोजी शनी ने 30 वर्षा नंतर स्वताच्या राशी मध्ये प्रवेश केला आहे. शनी या वेळी मकर राशीत आहेत. त्यामुळे धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनीची साढ़ेसाती सुरु आहे. त्याच सोबत मिथुन आणि तुला राशीवर छोटी साडेसाती चा परिणाम आहे. वक्री शनी चा सगळ्यात जास्त परिणाम याच राशीच्या लोकांवर होईल.

मेष : मकर राशी मधील शनी वक्री होण्यामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक प्रगती होण्याची शक्यता येथे बनत असल्याचे दिसून येत आहे.

वृषभ : या राशीच्या लोकांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. प्रवास करणे शक्य तेवढे टाळले पाहिजे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. त्यामुळे वाहने देखील सावधानतेने चालवावीत.

मिथुन : मिथुन राशी च्या लोकांना शनी वक्री असल्याने अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना पूर्व नियोजन करून केल्यास लाभ होईल.

कर्क : करियर च्या बाबतीत आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे. शनी गोचर प्रभावामुळे आपल्यावर आपले विरोधी हावी होण्याची शक्यता आहे.

सिंह : आपल्या राशीवर शनी वक्री असला तरी आपल्यावर मिश्र परिणाम दिसून येईल. एखाद्या सोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य प्राप्त होईल.

कन्या : आपल्यावर आर्थिक जबाबदाऱ्या वाढतील, संयमाने काम घ्यावे वेळ वाईट आहे लवकरच निघून जाईल काळजी करण्याचे कारण नाही.

तुला : शनी वक्री असल्याने या राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. धन विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना संयम ठेवावा.

वृश्चिक : वक्री शनी आपल्याला लाभ मिळवून देईल. करियर मध्ये नवी दिशा प्राप्त होईल. आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा दिसून येईल.

धनु : आपल्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याच सोबत आपल्याला कौटुंबिक आणि सामाजिक घडामोडीतून नुकसान होऊ शकते. त्यामुळे याकाळात सावध राहून कार्य करावे.

मकर : मकर राशी मध्येच शनी वक्री होत आहेत. त्यामुळे सर्वाधिक परिणाम याच राशीवर होईल. आपल्या आर्थिक स्थिती मध्ये सुधार होईल. एखाद्या नवीन मार्गाने आपल्याला धन लाभ होऊ शकतो.

कुंभ : कौटुंबिक बाबतीत आपल्याला थोड्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरगुती मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी फायद्याचे राहील.

मीन : समाजा मध्ये आपला मान सम्मान वाढेल. तसेच आपल्याला धन लाभ होण्याची देखील शक्यता आहे. लोक आपल्या शब्दाचा आदर करतील.

टीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.