Breaking News

शनि जयंती (22 मे) च्या दिवशी आपल्या राशी अनुसार केले पाहिजेत हे उपाय, प्रसन्न होतील शनिदेव

शनि जयंती 22 मे रोजी आहे आणि हा दिवस ज्येष्ठ महिन्याची अमावस्या देखील आहे. शनि जयंतीला शनिदेवची उपासना करणे फलदायी मानले जाते आणि शनिदेवची उपासना केल्यास शनि दोष दूर होते. म्हणूनच शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही शनिदेवची पूजा केली पाहिजे आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शनिदेवला प्रसन्न करणे खूप सोपे आहे, आपण या दिवशी आपल्या राशीनुसार उपाय करू शकता.

मेष : या राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी शनिदेव आणि हनुमान जी यांची उपासना करावी. त्यांची पूजा करताना शनिदेवसमोर तेलाचा दिवा लावा.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी दान करावे आणि चुकूनही कुणालाही आपल्या स्वार्थासाठी इजा करु नये. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवच्या मंत्रांचा जप करावा आणि फक्त काळे वस्त्र धारण करा.

मिथुन : या राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवा पूजा केली पाहिजे आणि शनिदेव यांना उडद डाळ अर्पण केली पाहिजे. शनिदेवाची पूजा केल्यावर तुम्ही आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत.

कर्क : या राशीच्या लोकांनी राजा दशरथ कृत शनी स्त्रोत पाठ करावा आणि खोटे बोलणे टाळावे. शनिदेव समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

सिंह : शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवची पूजा करुन त्यांना काळे वस्त्र अर्पण करा. त्याचप्रमाणे हनुमान जीची पूजा करावी आणि त्यांना देखील वस्त्र अर्पण करा.

कन्या : कन्या राशीचे लोक शनिदेवशी संबंधित मंत्रांचा जप करू शकतात आणि गरीब लोकांना काळ्या वस्तू देखील दान करू शकतात. तसेच, गरीब लोकांना भोजन द्या. या राशीच्या लोकांनी राग कमी केला पाहिजे आणि शांत रहावे.

तुला : गरजू लोकांना मदत करा आणि शनिदेव यांची पूजा करताना त्यांना मोहरीच्या तेलाने अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर शनिदेव समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

वृश्चिक : या राशीच्या लोकांनी शनिदेव यांना लोखंडी वस्तू अर्पण करुन हनुमान चालीसाचे पठण करावे. मुंग्याना पीठ द्या.

धनु : शनिवारी जयंतीच्या दिवशी शनिदेवची पूजा केल्यानंतर पीपळाच्या झाडाचीही पूजा करावी आणि पीपलच्या झाडावर पाणी आणि काळी तीळ अर्पण करा.

मकर : मकर राशीच्या लोकांनी शनिदेवच्या वैदिक मंत्राचा जप करावा आणि शनिदेवाला काळी तीळ अर्पण करावी. काळी तीळ देण्याबरोबरच तुम्हाला इच्छा असल्यास शनिदेव यांना मोहरी ही अर्पण करू शकता.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी शनिदेवची उपासना करावी आणि शनिदेवाला काळे वस्त्र अर्पण करावे. शक्य असल्यास गरिबांना वस्त्र दान करा.

मीन : मीन राशीचे लोक बजरंग बाण पाठ करतात आणि गोरगरीब लोकांची सेवा करतात. याशिवाय अन्नधान्य दान करा. हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील आणि तुम्हाला शनि दोशा पासून रक्षण मिळेल.

वर नमूद केलेल्या उपायांव्यतिरिक्त प्रत्येक राशीच्या लोकांनी ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्र जप केला पाहिजे. याबरोबरच या दिवशी तीळ आणि तेलाने बनविलेले अन्न खावे आणि हनुमान नामाचा जप देखील करावा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.