astrologydharmik

6 गोष्टी ज्यांची काळजी शनिदेवाची पूजा करताना नेहमी घेतली पाहिजे

शनीवारी मुख्यतः शनिदेवाची पूजा केली जाते. शनिदेवाला सर्वात क्रूर ग्रह मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्याच्यावर शनीची साडेसाती असते त्याचे वाईट दिवस सुरु असतात. शनीचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी पूजा आणि उपाय केले जातात. शनिदेवाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत ज्या पुढील प्रमाणे आहेत.

शनिदेवाच्या पूजेच्या वेळी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला नाही पाहिजे. कारण तांबे हे सूर्याचे धातू आहे आणि ज्योतिष शास्त्रामध्ये शनी-सूर्य एक दुसऱ्याचे शत्रू आहेत. शनीदेवाची पूजा करताना नेहमी लोखंडी वस्तूंचा वापर केला पाहिजे.

लाल कपडे, लाल फळ किंवा लाल फुल शनिदेवाला अर्पण करू नये. कारण लाल रंग हा मंगळ ग्रहाचा आहे. हा देखील शनी ग्रहाचा शत्रू ग्रह मानला जातो. शनिदेवाची पूजा करताना निळ्या किंवा काळ्या रंगाचा वापर करणे शुभ असते.

शनिदेवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानले जाते, यासाठी पूजा करताना शनी मंत्राचा जप करताना आपले मुख त्या दिशेला ठेवल्यास लवकर शुभ फळ मिळतात.

शनिदेवाच्या अगदी समोरून दर्शन कधीही घेऊन नये.  असे केल्यामुळे शनिदेवाची दृष्टी सरळ तुमच्यावर पडल्यामुळे तुमच्या समस्ये मध्ये वाढ होण्याची शक्यता असते.

अस्वच्छ अवस्थे मध्ये कधीही शनिदेवाची पूजा करू नये. अस्वच्छ अवस्था म्हणजेच अंघोळ न करता, तोंड न धुता किंवा घाणेरडे कपडे परिधान करून.

शक्य असल्यास शनिदेवाला काळे तीळ आणि उडीद यांची खिचडी बनवून नैवेद्य द्यावे. या दोन्ही वस्तू शानिदेवास अत्यंत प्रिय आहेत. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.


Tags
Show More

Related Articles

Back to top button