मेष राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही कारणांमुळे तुमची सामाजिक प्रतिमा खराब होऊ शकते. व्यावसायिक जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. पैशाच्या बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. कुठेही पैसे गुंतवले नाहीत तर उत्तम. वैवाहिक जीवनात कुरबुरींचा सामना करावा लागू शकतो. शनिवारी दानधर्म करावा.

कर्क राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये वाद वाढू शकतात. खूप सावध राहण्याची गरज आहे. करिअरबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. जोडीदाराशी भांडण वाढू शकते. दर शनिवारी हनुमान पूजन करावे आणि सुंदरकांड पठण करावे.

सिंह राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. खर्चात अचानक वाढ झाल्याने तुमचे बजेट बिघडू शकते. एखाद्या अप्रिय बातमीमुळे मन खिन्न होऊ शकते. व्यवसाय करणार्‍यांसाठी आगामी काळ कठीण आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करावा. प्रत्येक शनिवारी व्रत ठेवा आणि शनिदेवाची पूजा करा.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी अस्तंगतचा काळ संमिश्र ठरू शकेल.भावंडांसोबतचे मतभेद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणे टाळा. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळा. व्यवसायात कोणतेही नवीन प्रयोग करणे टाळा. प्रवासात विशेष काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

कुंभ राशीत शनीने प्रवेश केला असून, याच राशीत सुमारे ३१ दिवसांसाठी शनी अस्त होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना हा काळ संमिश्र ठरू शकेल. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय खूप विचार करून घ्यावा. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावे. ऑफिसमध्ये बॉसचा खूप दबाव सहन करावा लागू शकतो. व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. – सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.