celebritiesentertenment

शाहरुख ने जर ही अट मान्य केली नसती तर आज बनला नसता बॉलीवुडचा बादशाह !

बॉलीवुडचा बादशाह म्हणून प्रसिध्द असलेल्या शाहरुख खानचे नाव भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. शाहरुख खान ला बॉलीवुडचा बादशाह आणि किंग खान सुध्दा म्हंटले जाते.

अर्थातच यशाच्या आणि स्टारडमच्या टप्प्या पर्यंत पोहचण्यासाठी शाहरुखला स्ट्रगल पण करावा लागला. पण हे पण एक सत्य आहे की कोणत्याही गॉड फादर शिवाय यशाचे शिखर चढता येत नाही.

शाहरुखच्या स्ट्रगलच्या काळात एक वेळ अशीपण आली होती की त्याच्या समोर एक विचित्र अट घातली गेली आणि शाहरुखने वेळेचे भान ठेवून ती अट मान्य केली. जी त्याच्या करियरला शिखरावर घेऊन जाण्यासाठी फार महत्वाची ठरली.

चला पाहूयात कोणती होती ती अट जी मान्य केल्यामुळे शाहरुख यशाच्या शिखरावर गेला.

शाहरुखला जर आज लोक किंग खान या नावाने ओळखत असले तरी यामध्ये डायरेक्टर लेख टंडन यांचे मोठे योगदान आहे कारण त्यांनी एका अनोळखी अभिनेत्याला ब्रेक दिला होता.

ही गोष्ट 80 च्या दशकाची आहे ज्यावेळी शाहरुख आपले केस लांब ठेवत असे आणि लेख टंडन त्यावेळी दिल्ली मध्ये टीवी सिरीयल शूट करत होते.

एक दिवस लांब केसवाला एक तरुण त्यांच्या सेटवर कोणालातरी सोडण्यासाठी आला. तो दुसरा कोणीही नाही तर आजचा बादशाह म्हणजेच तेव्हाचा शाहरुख खान होता.

बातम्यांच्या अनुसार शाहरुखला पाहताच लेख टंडन ने त्यांना थांबवले आणि विचारले की तू माझ्या सोबत काम करशील का, पण त्याच सोबत त्यांनी एक अट पण घातली ती अट ही होती की शाहरुखला आपले लांब केस कापावे लागतील.

यावर शाहरुख ने विचारले जर मी केस कापले आणि तरीपण मला काम करण्याची संधी नाही मिळाली तर? शाहरुखच्या या प्रश्नावर लेख टंडन म्हणाले केस कापून ये काम जरूर मिळेल.

ज्यानंतर शाहरुख केस कापून आला पण लेख टंडन म्हणाले एवढ्याने भागणार नाही तुला अजून लहान केस करावे लागतील. शेवटी शाहरुखने त्यांची अट मान्य केली आणि अजून लहान केस करून आला.

केस कापण्याच्या या अटी प्रमाणे शाहरुखला टीवी सिरीयल “दिल दरिया” मध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिरीयल मध्ये शाहरुख ने चांगले काम केले होते ज्यानंतर त्याचे नाव “फौजी” सिरीयलसाठी पुढे केले गेले. फौजी सिरीयल टीवीवर पहिले टेलिकास्ट झाली होती.

यानंतर शाहरुख आपल्या मेहनतीच्या बळावर बॉलीवुड मध्ये आला आणि पुढे त्याने आपले राज्य प्रस्थापित करून किंग खान झाला.


Show More

Related Articles

Back to top button