भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठरला सांगितले होते घरात सुख समृद्धी ठेवण्याचे रहस्य

प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये सुख शांती असावी असे वाटते त्यासाठी त्याचे अनेक प्रयत्न सुरु असतात. ते आपल्या कुटुंबाच्या सुखी जीवनासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत असतात. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये नेहमी सुख शांती राहावी आणि त्याच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारची समस्यांचा सामना करावा लागू नये. पण असे असले तरी तरीही घर परिवारामध्ये समस्या आणि संकटे आल्याचे दिसून येते. पण तुम्हाला माहीत आहे का कि फक्त पाच वास्तूंमुळेच तुम्हाला ते सगळे मिळू शकते ज्याची इच्छा तुम्हाला आहे. होय हे अगदी खार आहे, महाभारत मध्ये युधिष्ठिर ने भगवान श्री कृष्ण यांना विचारले होते कि सुख समृद्धी मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यांचाकडे लक्ष दिले पाहिजे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या त्यापैकी काही आज आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

चला पाहू घरामध्ये सुख समृद्धी कोणत्या पाच वस्तूंनी वाढते

घरामध्ये तुपाचा दिवा लावा

जसे कि आपल्या सगळ्यांना माहित आहे कि व्यक्तीने जर तुपाचे सेवन केले तर यामुळे शारीरिक शक्ती प्राप्त होते. तुपाचे आपले एक वेगळेच महत्व आहे यामुळे आपले शारीरिक आरोग्य चांगले राहते. जर आपण आपल्या घरामध्ये संध्याकाळी तुपाचा दिवा लावला तर यामुळे घरात सुख समृद्धी बनून राहते.

पाण्याचे महत्व

जर आपण वास्तू शास्त्र अनुसार पाहिले तर घराच्या आत स्वच्छ पाणी ठेवण्यास महत्व आहे. जर आपल्या घरामध्ये कोणताही पाहुणा आला तर त्यास सगळ्यात पहिले पाणी पिण्यास दिले पाहिजे. जर आपण असे केले तर कुंडली मधील सगळे दोष समाप्त होतात.

घरामध्ये ठेवावे चंदन

आपण आपल्या घरामध्ये नेहमी चंदन ठेवले पाहिजे कारण चंदनाच्या सुंगधाने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. कोणत्याही पूजा-पाठ किंवा शुभ कार्यात चंदन वापरले जातात. जर आपण चंदनाचा तिलक आपल्या कपाळी लावला तर आपल्या मनाला शांती प्राप्त होते.

वीणा

माता सरस्वती बुद्धी आणि शिक्षणाची देवी मानली जाते त्यांना वीणा अत्यंत प्रिय आहे जर आपण आपल्या घरामध्ये वीणा ठेवली तर यामुळे आपल्या घरातील सदस्यांचा बुद्धी विकास होतो. त्याच सोबत कठीण परिस्थिती मध्ये धैर्य राखण्यास शक्ती मिळते.

मध

जर आपल्या घरामध्ये मध ठेवले असेल तर यामुळे अनेक प्रकारचे दोष शांत होतात. पूजा-अर्चना करताना देवी देवतांना हे अर्पण केले जाते. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये रोज पूजा होते त्यांनी आपल्या घरा मध्ये मध ठेवले पाहिजे.

वर सांगितलेल्या पाच महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि आपल्या घरातील सुख समृद्धी प्राप्तीसाठी यांचा वापर केला पाहिजे. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल अशी आशा आहे.

आम्ही शेयर करत असलेले लेख तुम्हाला नेहमी मिळवण्यासाठी या पोस्टला तुम्ही लाईक करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला पोस्ट आवडली नसेल तर तुम्ही स्माईल किंवा एंगर रिएक्शन देखील देऊ शकता. ज्यामुळे आमच्या यानंतरच्या महत्वाच्या पोस्ट तुम्हाला मिळू शकतील हे अगदी मोफत आहे हे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here