Connect with us

स्कूल बस पिवळी आणि एयरप्लेन सफेद रंगाचे का असते काय असते यामागे कारण

Entertenment

स्कूल बस पिवळी आणि एयरप्लेन सफेद रंगाचे का असते काय असते यामागे कारण

तुम्ही पाहिले असेले की बहुतेक स्कूल बसचा रंग हा पिवळा असतो आणि एयरप्लेनचा रंग सफेद असतो. आता काही प्रमाणात हे रंग दुसरे पण असतात पण त्याचे प्रमाण फार कमी आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे सफेद आणि पिवळा रंगच का वापरतात. लहान मुलांना तर लाल रंग प्रचंड आवडतो मग त्यांच्या स्कूल बसचा रंग लाल का नसतो आणि एयरप्लेन सफेद का असतो तो पण लाल रंगाचा असेल तर आकाशात सहज दिसेल पण असे नसते. चला पाहू या मागे काय आहे खरे कारण की स्कूल बस पिवळी आणि विमान सफेद असते. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडेल.

चला सर्वात पहिले पाहू स्कूल बस पिवळ्या रंगाची का असते.

यामागे कारण हे आहे की पिवळा रंग इतर अन्य रंगाच्या तुलनेत 1.24 पटीने जास्त आकर्षक असतो आणि अन्य कोणत्याही रंगाच्या तुलनेत लवकर दिसतो. 1930 मध्ये अमेरिकेत सर्वात पहिले या गोष्टीची पुष्टी झाली होती.

एयरप्लेन सफेद का असतात

एयरप्लेन सफेद असण्या मागे एक नाही तर अनेक कारणे आहेत. ज्यामुळे एयरप्लेनचा रंग सफेद ठेवला जातो. चला पाहू याची कारणे.

सर्वात पहिले तर प्लेनचा प्रवास सुरु करण्या अगोदर ते अनेक प्रकारच्या तपासणी मधून जाते यामध्ये हे देखील तपासले जाते की प्लेनला कोणताही डेंट तर नाही आहे ना. सफेद रंग असल्यास बॉडी वरील डेंट लवकर दिसतो.

दुसरे कारण व्हाईट कलर दुसऱ्या रंगाच्या तुलनेत जास्त रीफलेक्ट करते यामुळे प्लेन मधील तापमान संतुलित राहते.

तसेच याचे आणखी एक कारण असे आहे की जेव्हा प्लेन सफेद असतात तेव्हा ते हलके असतात पण रंगवलेले प्लेन अपेक्षेने भारी असतात.

त्याच सोबत तुम्हाला माहीत असावे की प्लेनचा रंग सफेद ठेवण्याचे अजून एक कारण आहे की जर प्लेन क्रैश झाल्याच्या स्थिती मध्ये जर प्लेनचे तुकडे सफेद रंगाचे असतील तर प्लेन शोधणे जास्त सोप्पे जाते.

याच सोबत अजून एक फैक्ट हा आहे की प्लेन रंगवण्याचा खर्च भरपूर येतो आणि त्यास सुकण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे प्लेन पेंट करण्याचा अर्थ असा की प्लेन बऱ्याच दिवस प्रवास करू शकणार नाही ज्यामुळे तो एक नुकसान देणारा निर्णय होतो.

तर आता तुम्हाला समजले असेलच की शाळेची बस पिवळी का आणि एयरप्लेन सफेदच का असते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हे आहे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, दरवर्षी वाढते लांबी

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top