Connect with us

सतत हात धुण्याची सवय आपल्याला आजारी करू शकते, जाणून घ्या मंग हात कधी धुवावेत

Health

सतत हात धुण्याची सवय आपल्याला आजारी करू शकते, जाणून घ्या मंग हात कधी धुवावेत

स्वच्छतेने राहणे आपल्या लाइफस्टाइलचा भाग झालेला आहे. आपल्याला लहानपणा पासून बाहेरून आल्यावर हात धुण्याची सवय लावली जाते. जेवणाच्या अगोदर हात धुण्याच्या बद्दल लहानपणी तुम्ही अनेक वेळा बोलणे ऐकले असेल. तेव्हा कदाचित मोठ्यांचे हे बोलणे फारसे आवडत नसेल पण मोठे झाल्यावर याचे महत्व समजते कि घरातील मोठ्यांनी दिलेला हा सल्ला आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.

U.S के डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन सेंटर अनुसार आपल्याला निरोगी राहण्यासाठी हातांची साफसफाई ठेवणे आवश्यक आहे. पण तुम्हीला आश्चर्य वाटेल कि जर तुम्हाला हात धुण्याची सवय जास्त असेल तर ही सवय तुम्हाला आजारी पाडू शकते. आता तुमच्या मना मध्ये प्रश्न आला असेल कि तर मंग निरोगी राहण्यासाठी किती वेळा हात धुतले पाहिजेत.

हेल्थ एक्सपर्टस अनुसार आपल्या स्कीनवर दोन प्रकारचे बैक्तीरीया असतात. एक जे आपल्याला आजारी करतात आणि दुसरे जे आपल्याला आजारी होण्या पासून वाचवतात.

त्यामुळे जर एका मर्यादे पेक्षा जास्त हात धुणे आपल्या स्कीनवर असलेले अनहेल्दी बैक्तीरीया सोबत हेल्दी बैक्तीरीया देखील काढून टाकतात. ज्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होते.

फक्त हेल्दी बैक्तीरीयाच नाही तर सतत हात धुण्यामुळे आपली स्कीन देखील कोरडी होते कारण असे केल्यामुळे आपल्या स्कीनवर असलेले हेल्दी ऑईल निघून जाते आणि स्कीन ड्राय होते.

अनेक लोक हात स्वच्छ ठेवण्यासाठी सैनेटाइजर वापरतात. हेल्थ एक्सपर्ट अनुसार हातांवर सारखे सैनिटाइजर वापरणे देखील आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. सतत हात धुण्या पेक्षा सैनिटाइजर जास्त वापरणारे लोक लवकर आजारी पडतात.

या पोस्टचा उद्द्श असा बिलकुल नाही कि आपण हात स्वच्छ नाही केले पाहिजे आणि हात धुतले नाही पाहिजेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो त्याच पद्धतीने जास्त वेळा हात धुणे देखील नुकसानदायक होऊ शकते.

स्वच्छ राहण्यासाठी आपल्या हातांना स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, कारण हातांच्या मार्गे बैक्तीरीया आपल्या पोटा मध्ये जातात आणि आपण आजारी पडतो.

आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि आपल्याला आपले आहत कधी आणि किती स्वच्छ करायचे आहेत. जसे कि टॉयलेट मधून निघाल्यावर हात धुणे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने जेवणाच्या अगोदर हात धुणे आवश्यक आहे. हैंड सेनेटाइजर तुम्ही आपला मोबाईल वापरल्या नंतर किंवा एखाद्या पब्लिक प्लेस मध्ये गेल्यास करू शकता.

Continue Reading
Advertisement
You may also like...

More in Health

Trending

To Top