Aadhaar Card : देशातील सर्व नागरिकांना आधार कार्ड (Aadhaar Card) देणारी सरकारी संस्था UIDAI ने सर्व आधार धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. साधारणपणे असे दिसून येते की बहुतेक लोक त्यांच्या आधार कार्डची अजिबात काळजी घेत नाहीत आणि ते कोठेही फोल्ड करून ठेवतात. इतकंच नाही तर अनेक लोक आपल्या आधार कार्डमध्ये अनेक प्रकारे छेडछाड करतात. असे केल्याने आधार कार्ड खराब होते. मात्र, पूर्वी लोकांचे आधार कार्ड खराब असतानाही काम व्हायचे कारण कोणत्याही संस्थेला फक्त 12 अंकी आधार क्रमांक आवश्यक होता पण आता ते होणार नाही. UIDAI ने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी त्यांच्या आधार कार्डमध्ये अजिबात छेडछाड करू नये आणि ते काळजीपूर्वक जपून ठेवावे.
आधार कार्ड सुरक्षित काळजीपूर्वक ठेवणे का आवश्यक आहे?
ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरण्यापूर्वी, त्याची सत्यता किंवा प्रमाणिकता तपासणे आवश्यक आहे, अशी सूचना UIDAI ने सर्वांना दिली आहे. अशा परिस्थितीत आधार कार्डची सत्यता तपासण्यासाठी त्यावर छापलेला QR कोड स्कॅन करावा लागेल. जर तुमचे आधार कार्ड निष्काळजीपणामुळे खराब झाले असेल तर क्यूआर कोडद्वारे त्याची सत्यता तपासणे खूप कठीण होईल.
क्यूआर कोड स्कॅन न झाल्यास तुमचे महत्त्वाचे काम अडकू शकते
अशा परिस्थितीत, तुमच्या आधार कार्डचा QR कोड सामान्य QR कोडप्रमाणे स्कॅनरद्वारे स्कॅन केला जाण्याची शक्यता जास्त असते. आता तुमचे काम कितीही महत्त्वाचे असले तरी तुमच्या आधार कार्डची सत्यता तपासल्याशिवाय तुमचे काम होणार नाही. यामुळेच आता आधार कार्डची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तुम्हीही तुमचे आधार कार्ड फोल्ड (घडी करून) ठेवत असाल तर सावधान.
आधार कार्ड कसे सुरक्षित ठेवावे
- आधार कार्ड लॅमिनेटेड करा आणि ते दुमडले जाऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवा.
- काम झाल्यानंतर इकडे तिकडे आधार कार्ड ठेवू नका.
- तुमचे आधार कार्ड लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा, मुले तुमचे आधार कार्ड खराब करू शकतात.
- आधार कार्ड अशा ठिकाणी ठेवा जिथे उंदीर पोहोचू शकत नाहीत.
- जर तुमच्याकडे प्लास्टिक आधार कार्ड असेल तर ते तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. याशिवाय जर तुमचे आधार कार्ड कागदी असेल तर ते वॉलेटमध्ये ठेवू नका. पाकिटात ठेवलेले कागदी आधार कार्ड खराब होण्याची शक्यता खूप जास्त आहे.