SBI ने घेतला मोठा निर्णय ग्राहकांवर ओढवले संकट, तुमच्या घरचे बजेट बिघडवू शकते

SBI Loan: एसबीआय बैंक आपल्या देशातील सर्वात मोठी सरकारी बैंक आहे. SBI च्या ग्राहक वर्ग देखील मोठा आहे. स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या खाते धारकांना मोठा झटका दिला आहे.

एसबीआय ने लोन वरील व्याज दर (एमसीएलआर) 0.25 टक्क्यांनी वाढवले आहेत. यामुळे ग्राहकांना लोन वर (एसबीआई लोन ईएमआई) पहिल्या पेक्षा जास्त ईएमआई द्यावा लागेल ज्यामुळे तुमच्या घरचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

SBI ने आपले नवीन लोन इंटरेस्ट रेट 15 डिसेंबर पासून लागू केले आहेत. ही माहिती एसबीआय च्या अधिकृत वेबसाईट वर आधारित आहे. एसबीआय ने आपला निर्णय भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) ने घेतलेल्या निर्णया नंतर केला आहे.

डिसेंबरमध्ये एमपीसीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. यासह, सध्याचा रेपो दर 6.25% वर पोहोचला आहे. रेपो दरात ही सलग पाचवी वाढ आहे.

मे 2022 मध्ये रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 50 बेसिस पॉइंट्सनी वाढ झाली. केंद्रीय बँकेने मे 2022 पासून व्याजदरात 2.25% वाढ केली आहे.

रेपो दरात वाढ झाल्यामुळे आरबीआयकडून बँकांना मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर ६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बँका त्यांचा MCLR वाढवत आहेत. SBI ने MCLR वाढवल्यानंतर, एका दिवसासाठी नवीन MCLR 7.60 टक्क्यांवरून 7.85 टक्क्यांपर्यंत वाढेल. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 7.75% वरून 8.00% पर्यंत वाढेल.

मित्रांनो , ही होती SBI ने वाढवलेल्या कर्जावरील व्याजदराची संपूर्ण माहिती

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: