LPG Gas Subsidy देशभरात एलपीजीच्या वाढत्या किमतींपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होऊ शकते. केंद्र सरकार येत्या बजेटमध्ये एलपीजी सिलेंडर वरील सबसिडी पुन्हा सुरू करू शकते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर सुमारे ₹ 300 ची सबसिडी दिली जाऊ शकते. म्हणजेच आता सिलेंडरची किंमत थेट ₹1000 ते ₹700 च्या जवळपास असेल. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
Subsidy योजना सुरू केल्यानंतर, थेट DBT द्वारे सर्व ग्राहकांच्या बँक खात्यावर ₹ 303 ची सबसिडी पाठवली जाईल. यामुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ₹300 ची मोठी कपात होणार आहे. झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील अनेक राज्यांसह देशातील विविध राज्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरवर आधीच सबसिडी दिली जाते.
त्यामुळे देशातील इतर राज्यांमध्येही अनुदान सुरू करण्याच्या योजनेवर केंद्र सरकारने काम सुरू केले आहे. वित्त मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार पेट्रोलियम कंपनीच्या डीलरला ₹ 303 ची सबसिडी देईल आणि एलपीजी सिलिंडरवर तेवढीच सूट मिळेल. यामुळे आता 1000 रुपयांना मिळणार्या गॅस सिलिंडरची किंमत 300 रुपयांनी कमी होणार आहे, म्हणजेच सुमारे 600 वरून 700 रुपयांपर्यंत.