Breaking News

एक्टर बनण्यासाठी या 5 सुपरस्टार्स नी सरकारी नोकरी सोडली, नंबर 1 तर जगभरात फेमस

बॉलिवूड मध्ये दररोज अनेक लोक आपली नोकरी आणि बिझनेस सोडून मुंबईच्या दिशेने येतात. ते केवळ या चंदेरी दुनियेचा एक भाग होण्यासाठी यापैकी काही मोजके लोक यशस्वी होतात आणि बाकीच्या लोकांच्या नशिबी पुन्हा परतण्या शिवाय दुसरा पर्याय उरत नाही.

काही लोकांना थेट मुख्य भूमिका मिळतात तर काही लोकांना छोटे मोठे रोल करत हळूहळू पुढे जावे लागते. पण आज आपण बॉलीवूडच्या अश्या काही अभिनेत्या बद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपले एक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारी नोकरी देखील सोडली होती. चला जाणून घेऊ कोण आहेत हे एक्टर.

अमरीश पुरी

अमरीश पुरी बॉलिवूड मधले एक प्रसिद्ध खलनायक आणि चरित्र अभिनेता होते. अमरीश पुरी यांना अफाट यश मिळाले. पण संघर्षाच्या काळात स्क्रीन टेस्ट मध्ये अपयशी राहत होते. ज्यामुळे त्यांनी “भारतीय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” मध्ये नोकरी केली. पण आपले एक्टर होण्याचे प्रयत्न त्यांनी थांबवले नाहीत आणि शेवटी हळूहळू त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि ते एक यशस्वी एक्टर झाले.

शिवाजी साटम

सीआयडी चे एसीपी प्रद्युमन हे किती प्रसिद्ध आहेत हे आपल्याला माहीत आहेच. हिंदी सोबत मराठी मध्ये देखील त्यांनी अनेक चित्रपटा मध्ये अभिनय केला आहे. शिवाजी साटम हे अगोदर बैंक ऑफ इंडिया मध्ये कैशियर ची नोकरी करत होते. पण अभिनेता झाल्यावर देखील त्यांना सगळ्यात जास्त प्रसिद्धी एसीपी च्या भूमिकेने दिली जी एका सरकारी अधिकाऱ्याची भूमिका होती हा देखील एक योगायोगच म्हणावा लागेल.

बलराज साहनी

बलराज साहनी हे एक उत्तम एक्टर होते. बॉलिवूड मध्ये येण्या अगोदर ते प्रोफेसर ची नोकरी करत होते. बॉलिवूड मध्ये येण्याच्या अगोदर बलराज साहनी आपली प्रोफेसर ची नोकरी शांति निकेतन विश्वविद्यालय, बंगाल मध्ये करत होते.

देव आनंद

देव आनंद हे आपल्या काळातील सगळ्यात सुंदर आणि देखणे एक्टर होते. आजही त्यांचे ब्लैक अँड व्हाईट चित्रपट लोक आवडीने पाहतात कारण त्यांची जादू काही वेगळीच होती. पण देव आनंद एक्टर बनण्याच्या अगोदर मुंबई मध्ये सेंसर बोर्ड चे क्लार्क होते. पण बॉलिवूड मध्ये आल्या नंतर त्यांनी हि नोकरी सोडली.

रजनीकांत

रजनीकांत यांचे फैन्स पूर्ण जगभर आहेत. मुख्यतः साऊथ चित्रपटा मध्ये रजनीकांत यांनी आपले करियर केले असले तरी बॉलिवुड मध्ये केलेल्या त्यांच्या चित्रपटाला लोकांनी पसंत केले आहे. रजनीकांत चित्रपटात येण्या अगोदर बैंगलोर परिवण सेवा मध्ये बस कंडक्टर म्हणून नोकरी करत होते. पण चित्रपटात काम सुरु केल्या नंतर त्यांनी नोकरी सोडली.

असे अनेक एक्टर आहेत जे आपली सरकारी नोकरी सोडून एक्टर बनण्यासाठी मुंबईला आले आणि अभिनय क्षेत्रात यशस्वी झाले. अश्याच तुम्हाला माहीत असलेल्या अभिनेता किंवा अभिनेत्री चे नाव कमेंट मध्ये लिहा आणि ते एक्टर होण्याच्या अगोदर कोणती नोकरी करत होते हे पण सांगा. चला पाहू आपल्याला किती माहिती आहे.

About Marathi Gold Team