People

काही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात

तुम्हाला समजल्यावर आश्चर्य आणि राग सुध्दा येईल की IAS, PCS सारख्या मोठ्या सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये काही असे प्रश्न विचारले जातात जे ऐकल्यावर तुम्हाला हसू येईल. तर काही वैयक्तिक प्रश्न असे विचारले जातात जे ऐकल्यावर तुम्हाला असे वाटेल की मुलाखत घेणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढावा. चला तर पहिले आपण पाहू असे प्रश्न कोणते असतात आणि नंतर जाणून घेऊ असे प्रश्न विचारण्या मागे त्यांचा काय उद्देश असतो.

फनी प्रश्न जे इंटरव्यू मध्ये विचारले जातात

तुमची पत्नी हातात किती बांगड्या घालते?

आज सकाळी नाश्ता किती वाजता केला?

तुमच्या शर्ट वर किती बटन आहेत?

तुमच्या शेजारच्या मुलीचे केस किती लांब आहेत?

सकाळी कोणत्या साबणाने अंघोळ केली?

तुमची आई कॉटन साडी घालते का जोर्जेट?

तुम्ही कोणत्या रंगाचा अंडर गारमेंट घातले आहे?

तुमच्या बायकोचे दुसऱ्या कोणाबरोबर चक्कर सुरु झाले तर काय कराल?

तुमची बायको तुम्हाला प्रेमाने जानू म्हणते का जान?

तुम्ही ज्या बसने आलात त्या बसचा रंग कोणता होता?

रात्री भाजी मध्ये मीठ कसे होते?

हे काही प्रश्न आहेत जे मोठमोठ्या पदावरील नोकरीसाठी मुलाखती मध्ये विचारले जातात.

असे प्रश्न विचारण्याचे काय कारण असते?

वरील काही प्रश्न मजेशीर तर काही संताप आणणारे प्रश्न वाचून तुम्हाला नक्कीच मनात प्रश्न निर्माण झाला असेल की इंटरव्यू मध्ये असे प्रश्न विचारण्या मागे यांचा हेतू काय असतो. का उगाचच असे प्रश्न विचारले जातात पण प्रत्यक्ष उमेदवाराची निवड अगोदरच झालेली असते.

तर तुम्हाला सांगू इच्छितो की असे प्रश्न विचारण्यामागे कारण आहे ते म्हणजे असे प्रश्न विचारून मुलाखत घेणार हे पाहण्याचा प्रयत्न करतो की व्यक्ती मध्ये किती आत्मविश्वास आहे, बाहेरील जगाचे त्याला कितपत ज्ञान आहे, कुटुंबा बरोबर तो किती जुळलेला आहे, तो किती सतर्क आहे, सामाजिक ज्ञान किती आहे इत्यादी. यामुळे समजते की व्यक्ती नोकरी करताना कसा वागेल त्याचा व्यवहार कसा असेल, त्याला लोकांशी कसे वागावे हे कळते का नाही. कारण बऱ्याच सरकारी नोकरी मध्ये सामान्य लोकांशी समोरसमोर संबंध येतो त्यावेळी अनेक लोक वेगवेगळ्या स्वभावाचे भेटतात त्यांच्या सोबत जुळवून घेण्याची उमेदवाराची क्षमता या प्रश्नातून समजते.

तुम्हाला विश्वास नाही वाटणार पण कधी कधी तर हे पण विचारले जाते की तुम्ही तुमच्या बायको बरोबर शेवटी कधी झोपले होते. असे खाजगी प्रश्न विचारून मुलाखत घेणारा बघत असतो की जर उमेदवाराला चिडवले तर तो चिडतो का? त्याला राग लगेच येतो का? याकरिता अश्या कोणत्याही प्रश्नाने चिडू नये तर संयमाने उत्तर द्यावे.

असे फनी आणि चिडवणारे प्रश्न ऐकून गोंधळू नका किंवा रागावू नका तर डोके थंड ठेवून आपल्या चातुर्याने उत्तरे द्या.


Show More

Related Articles

Back to top button