सलमान खान ने सोडला बिग बॉस, रागाने लाल होत म्हंटले ‘किसी और को ले आओ..’

0
22

टेलिव्हिजन वरील सगळ्यात प्रसिद्ध आणि तेवढाच विवादित सो बिग बॉस मध्ये नेहमी काही ना काही होत असते. प्रत्येक एपिसोड मध्ये प्रेक्षकांसाठी नवीन काही तरी असतेच. ज्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते. असाच एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे, ज्यामध्ये एक नवीन ट्विस्ट पाहण्यास मिळत आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांना धक्काच बसत आहे कारण हा व्हिडीओ सलमान खान बद्दल आहे ज्यामुळे त्याच्या फैन्स लोकांना धक्का बसत आहे म्हणजेच आश्चर्य होत आहे.

बिग बॉस हळूहळू आपल्या फिनाले पर्यंत जात आहे. त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढत आहे. याचाच अर्थ असा आहे कि सलमान खान बिग बॉसच्या घरातून कोणाला तरी घरा बाहेर काढणार आहे. पण सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये सलमान खान रागावलेला दिसत आहे. तसे तर सलमान खान ला अनेक वेळा बिग बॉस मध्ये रागावताना पाहिले आहे पण त्याच्या फैन्ससाठी एक मोठा धक्का आहे.

बिग बॉस 13 होस्ट करणारा सलमान खान बिग बॉस सोडण्याच्या निर्णय घेतला आहे. असे आम्ही नाही तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ म्हणत आहे. या व्हिडीओ मध्ये आपण सलमान खान हा शो सोडताना पाहू शकता, ज्यामुळे त्याच्या फैन्स लोकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कलर्स टीव्ही कडून शेयर केला आहे. ज्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकतो कि सलमान खान बिग बॉस मध्ये सहभागी झालेल्या लोकांचे ऐकून रागावतो, ज्यानंतर त्याचा राग अनावर होतो. यादरम्यान त्याने रागात म्हंटले आहे कि बिग बॉससाठी तुम्ही कोणालाही दुसऱ्याला हायर करा आणि यानंतर तो स्टेजच्या खाली उतरतो. याचा अर्थ असा आहे कि लोकांसाठी काही तरी जबरदस्त प्लान आहे आणि या आठवड्यात काहीतरी  टर्न आणि ट्विस्ट येणार आहे, ज्यामुळे आपला बीपी वाढू शकतो.

एकीकडे सलमान खान शो सोडण्याची बातमी येत आहे तर दुसरीकडे बिग बॉस बद्दल लोकांना राग आहे. यावेळी बिग बॉस शो वर अश्लीलता पसरवण्याचा आरोप होत आहे. ज्यामुळे ही गोष्ट कोर्टा पर्यंत गेली आहे. एवढंच नाही तर आता सूचना प्रसारण मंत्रालया कडून या शोवर नजर ठेवली जात आहे आणि लोकांकडून हा शो बंद करण्याची मागणी होत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे बिग बॉसच्या घराच्या आत आणि बाहेर दोन्ही कडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत.