entertenment

सलमान खान मुळेच या गरीबाच्या मुलीला मिळाली बॉलीवूड मध्ये संधी, अन्यथा कोणीही ओळखत देखील नव्हते

बॉलीवूड मध्ये कलाकारांची कमी नाही आहे येथे एका पेक्षा एक टैलेंटेड स्टार्स आहेत. काही स्टार्स असे आहेत ज्यांची पॉपुलरिटी जशी पहिले होती तशीच आज देखील आहे, जसे कि शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान. हे बॉलीवूडचे असे स्टार्स आहेत ज्यांच्या फिल्मच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. आज येथे त्यापैकी एक खान म्हणजेच सलमान खान बद्दल चर्चा करणार आहोत. सलमान खान बॉलीवूड मधील एक असा स्टार आहे जो नेहमी चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी चर्चेत असतो. परंतु आज येथे आपण त्याच्या चांगल्या कामा बद्दल माहिती घेणार आहोत.

मदतीसाठी असतो तयार

जसे कि आपल्या सगळ्यांना माहित आहे कि सलमानला राग लवकर येतो त्यामुळे बहुतेक वेळा तो आपल्या रागात केलेल्या कृत्यांमुळे मिडिया मध्ये चर्चेत असतो. त्याचा रागीट स्वभाव लपलेला नाही आहे. सलमानचा राग कधी कोणावर कोसळेल सांगता येत नाही. सलमानच्या रागाचा फटका बॉलीवूड मधील अनेक लोकांना बसलेला आहे. त्याच्या रागाचा फटका अनुराग कश्यप, अरिजीत सिंह, विवेक ओबेरॉय, ऋषी कपूर आणि रेणुका शहाणे सारख्या कलाकारांना पोहचला आहे. असे असले तरी हे नाकारता येणार नाही कि सलमान बॉलीवूड मधील एक असा कलाकार आहे जो लोकांच्या मदतीसाठी नेहमी सर्वात पुढे असतो. तो नेहमी गरजू लोकांची मदत करतो. प्रत्येकाची मदत करणे तर शक्य नसते पण त्याचा प्रयत्न असतो कि त्याच्या दरवाजातून कोणीही रिकाम्या हाती परत जाणार नाही.

अनेकांना केली मदत

सलमानच्या मुळेच आज इंडस्ट्री मध्ये अनेक अभिनेत्री काम करत आहेत आणि काही तर सुपरस्टार बनल्या आहेत. सलमानने मदत केलेल्या पैकी एक आहे कटरिना कैफ. कटरिनाला सलमानने आपल्या फिल्म मध्ये ब्रेक देऊन रातोरात फेमस बनवले होते आणि आज ती इंडस्ट्री मधील नंबर 1 ची हिरोइन आहे. या लिस्टमध्ये मध्ये अजून एक अभिनेत्री आहे जी अत्यंत गरीब कुटुंबातील होती आणि एकवेळ अशी होती जेव्हा ती सलमानच्या गाण्यामध्ये बैकग्राउंड डांसर देखील होती. पण सलमान खानने तिचे टैलेन्ट ओळखले. तुम्हाला माहित आहे का आम्ही कोणाच्या बद्दल बोलत आहोत?

अत्यंत गरीब कुटुंबातून होती डेजी

आम्ही बोलत आहोत बॉलीवूड मधील अभिनेत्री डेजी शाह बद्दल. खरतर फिल्म ‘तेरे नाम’ मधील गाणे ‘लगन लगी’ मध्ये डेजी बैकग्राउंड डांसर होती. पण त्यावेळी सलमानची नजर तिच्यावर पडली आणि डेजीचे आयुष्य बदलले. सलमानने आपल्या सोबत फिल्म ‘जय हो’ मध्ये तिला लीड एक्ट्रेस म्हणून घेतले. अनेक लोकांना माहित नसेल कि डेजी शाह ही एक अत्यंत गरीब कुटुंबातील होती आणि तिचे वडील ड्रायव्हर होते. हल्लीच डेजी सलमान सोबत फिल्म ‘रेस 3’ मध्ये देखील दिसली होती. डेजी आज देखील सलमानचे उपकार विसरली नाही आणि कदाचित कधी विसरणार देखील नाही. ती अनेक वेळा म्हणाली आहे कि जर सलमान नसता तर ती या इंडस्ट्री मध्ये नसती. सलमान ने डेजी शाह, कटरिना कैफ, स्नेहा उल्लाल आणि जरीन खान सारख्या अभिनेत्रींना संधी दिली आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button