celebrities

सलमान खानला पाहण्यासाठी नाही तर एका विशेष कारणासाठी रोज सकाळी त्याच्या घरा समोर गर्दी होते

दररोज सकाळी सलमान खानच्या घरा बाहेर लांब रांग पाहण्यास मिळते. पण ही गर्दी सलमान खानला पाहण्यासाठी नसते तर त्यामागे एक विशेष कारण आहे. हे जमा झालेले लोक सलमान खानला पाहण्यासाठी नाही तर उपचारासाठी येथे येतात. तुम्हाला माहित असेलच कि सलमान बीइंग ह्युमन संस्था चालवतो आणि त्याच्या माध्यमातून चेरीटी करतो. याचाच एक भाग म्हणून सलमानचे वडील मुंबईतील ग्लैक्सी अपार्टमेंट मध्ये गरीब लोकांच्या उपचारासाठी प्रयत्न करतात. यासाठी दररोज सकाळी लोकांची गर्दी सलमानच्या घरा बाहेर जमा होते.

साढे 8 वाजता उघडतो गैलेक्सीचा दरवाजा

सकाळी लोक गैलेक्सीच्या बाहेर लाईन लावून उभे असतात. सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सलमानचे वडील सलीम खान गैलेक्सीचा दरवाजा उघडतात. त्यांच्या सोबत एक डॉक्टर देखील असतो. डॉक्टर त्या रुग्णांची तपासणी करतो आणि त्यांना प्रिस्क्रिप्शन देऊन हॉस्पिटल मध्ये रेफर करतो. डॉक्टर रेफर करण्यासोबतच उपचारासाठी किती खर्च होईल हे देखील लिहून देतो. यानंतर सलीम खान त्यांना चेक देतात. हा चेक रुग्णाच्या नावावर नसतो, तर हॉस्पिटलच्या नावावर असतो.

हे कार्य 2007 पासून सुरु आहे

सलीम खान मागील 11 वर्षापासून अश्या पद्धतीने गरिबांची सेवा करत आहेत. सोमवार ते गुरुवार दररोज सकाळी साढे आठ वाजता त्यांचे हे हॉस्पिटल उघडते. पण सलीम खान यांनी यागोष्टीची कधी पब्लिसिटी केली नाही किंवा मोठेपणा देखील केला नाही. याबद्दल त्यांनी एकदा सांगितले कि चांगल्या कामाबद्दल कधी ढिंढोरा पिटण्याची गरज नसते.


Show More

Related Articles

Back to top button