astrology

सकाळी अंथरूणातून बाहेर येताना लक्षात ठेवा या गोष्टी, घरात कधीही पैश्यांची कमी होणार नाही

आपल्या समाजा मध्ये पूर्वापार काही परंपरा चालत आलेल्या आहेत त्यातील काही चांगल्या आहेत तर काही वाईट आहे. पण हल्ली आपण अंधश्रद्धा म्हणून वाईट परंपरे सोबत काही चांगल्या परंपरा आणि सवयींना सोडत आहोत ज्याचा कदाचित आपल्याला नजदीकच्या काळात काही नुकसान झाल्याचे दिसून येणार नाही. पण दीर्घकाळात त्या हळूहळू नुकसान देऊ शकतात. कारण आपल्या सर्वच परंपरा या अंधश्रद्धा नाही त्यापैकी बऱ्याच परंपरा या विज्ञानाला सहाय्य करणाऱ्या आहेत. तर काही खगोलशास्त्र डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत. चला पाहू अश्या काही गोष्टी ज्या सकाळी अंथरूणातून बाहेर येताना लक्षात ठेवल्यातर देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवतांची कृपा प्राप्त होईल.

सकाळी उठल्यावर सर्व प्रथम आपले हाताचे तळवे पाहावेत. असे केल्यामुळे महालक्ष्मी, सरस्वती सोबतच भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.

घरातील मंदिरामध्ये म्हणजेच देवारा / देवघर यामध्ये मुर्त्या आणि पूजेचे सामान व्यवस्थित ठेवलेले असावे. यामुळे देवी-देवता प्रसन्न राहतात. कुंडलीचे दोष देखील शांत होतात.

सकाळी पलंगावरून खाली जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर जमिनीला (भूमी) नमस्कार केला पाहिजे. सोबतच क्षमा मागावी कारण भूमीवर पाय ठेवल्यामुळे आपल्यास दोष लागतात.

जेव्हाही सकाळी भाकरी / पोळी बनेल तेव्हा पहिली पोळी गाईसाठी काढून ठेवावी. जेव्हा आपल्या घराच्या आसपास गाय येईल तेव्हा ती पोळी तिला चारावी.

रोज सूर्याला जल अर्पण करावे. या उपायामुळे घर-परिवार आणि समाजा मध्ये मान-सन्मान प्राप्त होतो आणि सूर्या संबंधीचे दोष दूर होतात.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लोक कासव असलेली अंगठी का घालतात? काय आहेत याचे फायदे? येथे पहा


Show More

Related Articles

Back to top button