Breaking News

पती-पत्नी च्या 6 सवयी वैवाहिक जीवन खराब करतात, तुम्हाला यापैकी किती सवयी आहेत…

सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक आहे की पती-पत्नी दोघेही समजदार असावेत त्यांना समाज आणि संसाराच्या संबंधित गोष्टी बद्दल योग्य माहिती असावी. चाणक्य ने देखील आपल्या निती शास्त्रा मध्ये पती आणि पत्नीच्या 6 गुणांच्या बद्दल चर्चा केली आहे. चाणक्य अनुसार वैवाहिक जीवन सुखी असण्यासाठी 6 सवयींवर नियंत्रण असणे अत्यावश्यक आहे. असे केले नाही तर नाते संपुष्टात येण्या पर्यंत गोष्टी पोहचू शकतात.

क्रोध : पती आणि पत्नी मध्ये जर कोणीही रागीट स्वभावाचा असेल तर कुटुंबा मध्ये कधीही शांती राहत नाही. नेहमी कलह होतो. तसेच दोघेही मानसिक रूपाने व्यथित राहतात. अश्या परिस्थिती मध्ये चांगली कामे देखील वाईट होतात.

गोपनीयता : वैवाहिक जीवना मध्ये सुखी राहण्यासाठी आवश्यक आहे कि पती आणि पत्नी मधील गोष्टी कोणत्याही तिसऱ्या व्यक्ती पर्यंत गेल्या नाही पाहिजेत. या गोष्टी जेवढ्या गुप्त राहतील नाते तेवढे चांगले राहील. आपल्या गोष्टी आपल्या पर्यंतच सीमित ठेवून चांगल्या गोष्टीवर चारचा करणारे पती-पत्नी नेहमी सुखी राहतात. ते नेहमी एकमेकांचा सन्मान करतात.

खर्च : कोणत्याही पती-पत्नीचे नाते तेव्हाच आनंदी राहू शकते जेव्हा दोघांनाही पैश्याच्या वापरा बद्दल चांगली माहिती असेल. दोघांनीं उत्पन्न आणि खर्च दोन्हीचे संतुलन कसे करतात याबद्दल माहीत असले तर कधी अडचण होत नाही आणि जीवनात आनंद राहतो. उत्पन्नाचा मोठा हिस्सा किंवा उत्पन्ना पेक्षा जास्त खर्च करणारे लोक उध्वस्त होतात.

मर्यादा : मर्यादेत राहणारे लोक नेहमी सुखी राहतात आणि त्याचे उल्लंघन करणारे आयुष्यभर पश्चाताप करतात. व्यक्तीने आपले संस्कार आणि मर्यादा कधीही विसरली नाही पाहिजे. यास विसरणाऱ्या पती-पत्नी मध्ये कलह उत्पन्न होतो.

धैर्य : व्यक्तीच्या जीवनामध्ये धैर्य महत्वाचा गुण मानला गेला आहे संकटकाळी जे पती-पत्नी धैर्याचा पारियाचं देत पुढे जातात त्यांना जास्त अडचणींचा सामना करावा लागत नाही. धैर्य नसलेल्या लोकांना जीवनात नेहमी हताशा आणि अनेक प्रकारच्या अडचणी येतात.

असत्य : पती-पत्नी मढी नाते असत्यावर टिकलेले नसावे त्यांच्या पैकी कोणीही असत्याचा सहारा घेतला तर एका काळा नंतर सत्य समोर येते आणि नंतर नात्यात कडवटपणा सुरु होतो. असत्य नात्याला उध्वस्त करते.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.