Connect with us

VIDEO: मुंबई अँथममुळे सचिन पिळगावकर प्रेक्षक भडकले, केले प्रचंड ट्रोल

Celebrities

VIDEO: मुंबई अँथममुळे सचिन पिळगावकर प्रेक्षक भडकले, केले प्रचंड ट्रोल

मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेता आणि टीव्हीवर महागुरू म्हणून सर्वांना परिचित असलेले सचिन पिळगावकर हे अनेक दिवसांनी पुन्हा चर्चेत आले आहेत. पण यावेळी जी चर्चा सुरु आहे ती कदाचित सचिन पिळगावकर यांना तर आवडणार नाहीच पण कदाचित यामुळे त्यांच्या चित्रपटाचे चाहते असलेल्या त्यांच्या चाहत्यांना देखील दुखः होईल. यामागे कारण आहे त्यांनी केलेले एक गाणे हे गाणे युट्युबवर अपलोड केले आहे या गाण्याला ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ असे नाव देण्यात आलेले आहे. पण हे गाणे ज्यांनी युट्युबवर पाहिले आहे त्यापैकी बहुतांश लोकांना ते आवडलेले नाही आणि त्यामुळे महागुरू सचिन पिळगावकर यांना नेटीझन लोकांनी ट्रोल केले आहे.

युट्युबवर हे गाणे शेमारू कंपनीच्या ‘शेमारू बॉलीगोली’ या युट्युब चैनलवर 16 ओगस्ट रोजी अपलोड केले आहे. हे गाणे जवळपास पाच मिनिटांचे आहे पण हे गाणे तुम्ही पाहण्याचे धाडस केले तर ते किती मिनिटे पाहू शकाल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ असे या गाण्याचे नाव असल्याने प्रेक्षक मुंबई बद्दल या गाण्यात काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे पाहण्यासाठी गाणे युट्युबवर पाहण्यासाठी गेले. ज्या गाण्यास सचिन पिळगावकर यांनी स्वता गायले आहे. पण गाण्याची शब्दरचना, संगीत आणि ते ज्याप्रकारे सादर करण्यात आले आहे ते पाहून प्रेक्षक कमालीचे भडकलेले दिसतात. या गाण्याची शब्दरचना मोहम्मद अकिल अन्सारी यांची असून व्हिडीओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केली आहे तर निर्मिती मन्नत फिल्मसने केली आहे.

युट्युबवर गाण्याच्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये लिहिले आहे ‘मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हिच वैशिष्ठ्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’,त्यामध्ये पुढे या गाण्याचा आस्वाद घ्या असेही नमूद करण्यात आले आहे.

या गाण्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आणि थोडाफार विचार करण्या सारख्या आहेत. कारण एका कमेंट मध्ये लिहिले आहे आपल्या मराठी भाषेत गायला लाज वाटली काय?? आणि हे खरे आहे आजकाल मराठी अभिनेते आणि अभिनेत्री असेच वागत आहेत त्यांना मराठी प्रेक्षक हवे आहेत पण मराठी भाषा नको आहे असेच जाणवते. कारण मराठी चैनलवर अनेक अवार्ड शो आणि ग्रैंड फायनलमध्ये हे कलाकार मराठी गाण्यावर नाही तर हिंदी गाण्यावर आपले नृत्य (धांगडधिंगा) सादर करत असतात. हेच पुन्हा या गाण्यातून देखील अधोरेखित झालेले दिसत आहे.

पहा काय प्रतिक्रिया आहेत या गाण्यावर लोकांच्या.

सचिन पिळगावकर यांच्या या गाण्या बद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट्स मध्ये लिहा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top