पुन्हा एकदा मैदानात दिसणार सचिन-वीरूची जोडी, टी-20 खेळणार आपले आवडते दिग्ग्ज खेळाडू

0
14

भारता मध्ये सचिन तेंडुलकर एवढी लोकप्रियता कदाचित कोणत्याच दुसऱ्या खेळाडूला मिळाली नसेल. धोनी, विराट हे लोकप्रिय असले तरी सचिन ची गोष्टच निराळी होती आहे आणि राहणार याबद्दल कोणाचेही दुमत नसेल कारण सचिन प्रत्येक वयोगटातील लोकांचा आवडता खेळाडू होता आणि अनेक लोकांनी तर सचिन क्रिकेट मधून निवृत्त झाल्या पासून क्रिकेट पाहणेच बंद केले आहे. पण सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेट मैदानात खेळताना दिसणार आहे. हे समजल्यावर तुम्हाला आनंद झाला असेल पण मनात विचार देखील आला असेल कि हे कसे शक्य आहे. खरंतर नियमाच्या अनुसार हे चुकीचे आहे पण आता एक नवा नियम बनला आहे त्या अनुसार एक सिरीज होणार आहे आणि यामध्ये सचिन तेंडुलकर सह अन्य सन्यास घेतलेले खेळाडू पुन्हा एकदा आपल्या खेळाचे प्रदर्शन दर्शकांना करून त्यांचे मनोरंजन करू शकणार आहेत.

फेब्रुवारी मध्ये दिसणार सचिन तेंडुलकर मैदानात

रोड सेफ्टी सिरीज मध्ये जगातील अनेक पूर्व क्रिकेटर सहभागी होणार आहेत. सध्या या सीरिजला खेळण्यासाठी जगातील 7 टीम तयार झाल्या आहेत. चांगली गोष्ट हि आहे कि हे सामने भारता मध्ये होतील. ज्यामध्ये अनेक देश सहभागी होतील. याचा अर्थ जगातील अनेक खेळाडूचा खेळ आपल्याला पुन्हा पाहण्यास मिळेल. हि सिरीज 6 फेब्रुवारी पासून सुरु होईल आणि फक्त 6 दिवस चालेल. यामध्ये सचिन सह अनेक दिग्ग्ज खेळाडू पुन्हा खेळताना दिसतील.

सचिन-वीरू पुन्हा एकत्र दिसणार

बातमी अनुसार सचिन आणि वीरू दोघेही या सिरीज मध्ये खेळणार आहेत आणि एकाच टीम मध्ये खेळणार असल्याने ते दोघे पुन्हा ओपनिंगला आल्याचे  आपल्याला दिसू शकते. आपल्याला माहीत आहेच कि सचिन आणि वीरू एकत्र मैदानात ओपनिंगला येणे म्हणजे किती आकर्षक खेळ पाहण्याची संधी असते.

तसेच ब्रेट ली देखील ही सिरीज खेळणार असल्याची बातमी आहे त्यामुळे सचिन-वीरू समोर ब्रेट ली गोलंदाजी करेल तेव्हा त्यांचा खेळ म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देणार हे नक्की आहे. हि बातमी वाचून आपल्याला आनंद झालाच असेल कारण सचिन आणि वीरूला पुन्हा एकत्र खेळताना पाहायला सगळ्यांनाच आवडेल पण प्रश्न फक्त एवढाच राहील कि ते पुन्हा पूर्वी प्रमाणे धडाकेबाज क्रिकेट खेळू शकतील का. कारण बरेच दिवस ते कोणत्याही स्पर्धात्मक क्रिकेट खेळताना दिसलेले नाहीत.