food

उन्हाळ्यात जरुर करा सब्जाचे सेवन

अंगाची काहिली वाढवणारा उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांची गरज असते. तसेच अधिकाधिक द्रव्य पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन निघते. यावेळी बाहेरची शीतपेये पिण्यापेक्षा घरगुती सरबते आरोग्यासाठी कधीही चांगली. यामुळे शरीराला अपाय होत नाही आणि शरीराची पाण्याची गरजही भागते.

उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करण्यासाठी सब्जाचाही वापर केला जातो. सब्जाचे बीज चवीला गोड लागते. याच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते.

लघवीचा त्रास होत असल्यास यावेळी सब्जाचे पाणी प्यावे. लघवीच्या वेळेस होणारा त्रास दूर होतो., तसेच अनेकांना युरिन इन्फेक्शनचा त्रास वारंवार जाणवतो. अशा व्यक्तींनी सब्जाच्या बिया सकाळ-संध्याकाळ घेतल्यास फरक पडतो.

सब्जा शरीरासाठी इतके चांगले आहे की त्याचा दिवसातून तीन ते चार वेळा सेवन कऱण्यास हरकत नाही. उन्हातून आल्यानंतर सब्जाचे पाणी प्यायल्यास खूप फायदा होता. उन्हामुळे त्वचेची होणारी काहिली बंद होते.

मलविसर्जन करताना दाह वा वेदना होणे,अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून वा गुदावाटे रक्त पडणे यावर उत्तम उपाय म्हणजे सब्जा.


Show More

Related Articles

Back to top button