वास्तुशास्त्राचे हे नियम आपले जीवन बदलतील, महालक्ष्मीच्या कृपेने मिळतील लाभदायक फायदे

मनुष्य जीवन अत्यंत कठीण मानले गेले आहे, अनेक वेळा असे होते कि काही ना काही कारणामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये तणाव उत्पन्न होतात, कुटुंबामध्ये काही वादविवाद होतात ज्यामुळे नात्यामध्ये कटुता येते. जेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्याच असतात तेव्हा त्याचे जीवन निराशाजनक वाटते. तसे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सुख आणि आनंद पाहिजे असते पण व्यक्तीची इच्छा असण्याने मात्र काही होत नाही जशी वेळ पुढे जात असते त्या अनुसार व्यक्तीच्या जीवनामध्ये चढउतार येतात.

आपण आपल्या जीवनातील काही समस्या वास्तु टिप्स वापरून दूर करू शकतात. वास्तुशास्त्रामध्ये काही असे नियम आहेत ज्यांचे  आपल्या जीवनामध्ये आनंद राहतो. आज आपण या पोस्टच्या माध्यमातून काही वास्तु टिप्स जाणून घेऊ. जर आपण यांचा अवलंब केला तर माता लक्ष्मी आपल्यावर कृपा दृष्टी करेल आणि आपल्या जीवनामध्ये शुभ फलप्राप्ती होईल.

महत्वाचे वास्तु नियम

आपण आपल्या घरामध्ये राईच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये लवंग टाकले तर यामुळे शुभ परिणाम मिळतात.

आपण गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपट्यास दूध अर्पित अवश्य केले पाहिजे, यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

जर आपण तव्यावर पोळी भाजण्याच्या अगोदर त्यावर दुधाचे काही थेंब शिंपडले तर ते शुभ मानले जाते. तसेच आपण घरा मध्ये बनणारी पहिली पोळी गाईला खाण्यास द्यावी यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

जर आपण आपल्या घरातील देवांची दररोज पूजा करत असाल आणि पूजेसाठी फुलांचा वापर करत असाल तर लक्षात ठेवा कि सुकलेली फुले घरा मध्ये ठेवू नयेत.

आपल्या घराच्या दक्षिण पूर्व दिशेच्या कोपऱ्यात हिरवळ असलेलं चित्र लावावे, हे शुभ मानले जाते.

आपण आपल्या घरातील नळामधून पाणी थेंब थेंब वाहून जात नाही याची काळजी घ्यावी कारण यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर आपल्या घरातील कोणत्याही नळामधून पाणी टपकत असेल तर त्वरित त्यास दुरुस्त करावे किंवा त्याजागी नवीन लावावे. अन्यथा आपल्या जीवनामध्ये पैश्यांच्या निगडित समस्या येऊ शकतात.

जर आपल्याला आर्थिक स्थिती मध्ये सुधारणा करायची असेल तर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे वास्तुचे हे नियम पाळले पाहिजेत. असे मानले जाते कि उत्तर किंवा पूर्व दिशेला बोअरिंग किंवा विहीर आर्थिक दृष्ट्या शुभ मानले जाते. त्यामुळे आपण घर खरेदी करताना किंवा बांधताना ही गोष्ट लक्षात घ्यावी.