Breaking News

राशी अनुसार जाणून घ्या कोणता धातु तुमच्यासाठी आहे सर्वाधिक भाग्यशाली

अनेक लोक सोन्या चांदीचे दागिने परिधान करतात तर काही लोक लोह आणि तांब्याची अंगठी परिधान करतात. परंतु लोकांच्या देखादेखी किंवा फैशन म्हणून ते असे करतात परंतु आपल्या माहितीसाठी राशीच्या अनुसार धातु धारण केल्यास सर्वाधिक लाभ होतो. चला जाणून घेऊ या बद्दल अधिक माहिती.

सोनं : गुरु हा सुवर्ण कारक मानला जातो. मेष, वृषभ आणि मिथुन राशिसाठी हा धातू खूप शुभ आहे. या 3 राशीच्या लोकांनी सोन्याचे बनलेले काहीही परिधान केले तरी याचा लाभ त्यांना प्राप्त होतो.

चांदी : या धातूचा स्वामी चंद्र ग्रह असल्याचे मानले जाते. कर्क, सिंह आणि कन्यासाठी हा धातु खूप फायदेशीर आहे. या राशीच्या लोकांनी प्रामुख्याने हे धातू परिधान केले पाहिजे.

लोह : लोह हे शनी देवास प्रिय असल्याचे मानले जाते. मकर, मीन आणि कुंभ राशीसाठी हा धातू उत्कृष्ट परिणाम देणारा मानला जातो. म्हणून, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लोहापासून बनवलेले काहीही परिधान केले पाहिजे.

तांबे : या धातूचा कारक ग्रह सूर्य मानला जातो. तुला, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा धातू अतिशय शुभ मानला जातो. म्हणूनच या राशीच्या लोकांनी तांबे परिधान केले पाहिजे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.