entertenment

वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर, आता मुलगा झाला लग्जरी घर आणि करोडो रुपयाचा मालिक

आपल्या देशामध्ये मेहनती लोक आणि प्रतिभेची कमी नाही आहे. पण तरीही देशा मध्ये अनेक परिवार गरिबी रेषाच्या खाली आपले जीवन जगत आहेत. पण त्या परीवारामधून देखील एखादा मुलगा असा निघतो जो आपल्या परिवाराचे नाव उज्वल करतो. तुम्ही बऱ्याचवेळा पाहिले असेल कि श्रीमंत घराची मुले बिघडलेली असतात आणि लहानपणा पासूनच त्यांना सर्व सुविधा मिळाल्यामुळे मोठे झाल्यावर देखील ते कोणतेही काम आपल्या मेहनतीने करू शकत नाहीत. तर गरीब कुटुंबातील मुले लहानपणा पासूनच मेहनती असतात आणि काही करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असते. आपल्या देशातील जेवढेही यशस्वी आईपीएस किंवा आईएस ऑफिसर आहेत, त्यामधील बहुतेक लोक गरिब कुटुंबातील आहेत.

पण असे म्हणतात ना कि परमेश्वर प्रत्येकाला मेहनतीचे फळ देतो आणि जेव्हा पण तो देतो ते छप्पर फाड देतो. आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही अश्याच एका व्यक्ती बद्दल सांगत आहे, ज्याने गरिबी पाहिली आहे आणि मेहनत करून पुढे गेला आहे. खरतर हा मुलगा दुसरा कोणी नसून इंडियाचा प्रसिध्द डान्सर आहे. हल्ली भारतामध्ये अनेक रियालिटी शो होतात. ज्यामधील बहुतांशी डान्स वर असतात. या शो मध्ये श्रीमंत आणि गरीब दोन्ही घरातील लोक शामिल होतात आणि आपल्या टैलेंटला जगा समोर दाखवतात.

एक भारतीय चैनल वर डान्स शो जिंकल्या नंतर फैजल खान आता एक्टिंग मध्ये येण्याचा विचार करत आहे. फैजल सध्या फक्त 20 वर्षाचा आहे. साधारण परिवारातील फैजल आज यशाच्या शिखरावर आहे. जेव्हा फैजल 14 वर्षाचा होता त्यादरम्यान तो डान्सिंग रियालिटी शो ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर 2’ जिंकला होता आणि या शो नंतर त्याचे आयुष्याच बदलून गेले.

फैजल ने प्रसिध्द ऐतिहासिक शो ‘भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप(2013-14)’ मध्ये लीड रोल केला होता आणि प्रेक्षकांची मने जिंकली होती. एवढेच नाही तर फैजल स्टार प्लस वरच्या डान्स रियालिटी शो ‘झलक दिखला जा सीजन 7’ चा देखील विनर आहे. तुमच्या माहितीसाठी फैजलचे वडील मुंबई मध्ये एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे. पण आपल्या टैलेंट मुळे फैजलकडे आज दोन लग्जरी कार आणि एक लग्जरी बाईक आहे. एवढेच नाही तर फैजलचा मुंबईमध्ये स्वताचा करोडो रुपयाचा फ़्लैट आहे. हल्ली फैजल आपल्या कुटुंबाच्या सोबत याच फ़्लैट मध्ये राहतो.

फैजलचा हा फ़्लैट 1 BHK आहे. एवढे पैसे कमावल्यानंतर देखील तो आपले पूर्वीचे दिवस विसरला नाही आहे आणि श्रीमंतीची हवा त्याच्या डोक्यात गेली नाही आहे. त्याला आजही आपल्या वडिलांच्या ऑटो रिक्षातूनच प्रवास करणे आवडते. फैजलच्या आई-वडिलांना त्याच्यावर गर्व आहे. फैजल सारखे असे अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे आपले वेगळे टैलेंट आहे पण प्लेटफार्म न मिळाल्याने ते आजही आपल्या ध्येयाच्या शोधात आहेत.


Show More

Related Articles

Back to top button