health

उपवास सोडताना या गोष्टींची काळजी घ्या

नवरात्री मध्ये देवीचे भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने व्रत-उपवास करतात. काही लोक 9 दिवस बिना अन्न पाणी सेवन करता उपवास करतात तर काही लोक एक वेळ भोजन करून करतात. व्रत कोणतेही असले तरी ते समाप्त करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्यामुळे आपले आरोग्य विषयक समस्या निर्माण होणार नाहीत.

आज आम्ही तुम्हाला व्रत सोडताना आरोग्य विषयक कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ते सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही आजारी होण्या पासून वाचू शकता.

ओवर इटिंग करणे टाळावे

व्रत सोडताना काही लोक भरपेट दाबून खातात जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. एकावेळीच जास्त भोजन करणे टाळावे. अनेक तास रिकाम्या पोटी राहिल्या नंतर एकदम पोटभर खाण्यामुळे पोटदुखी होण्याच्या सोबतच पचनक्रियेची समस्या देखील होऊ शकते.

पाणी प्यावे

दीर्घकाळ रिकाम्या पोटी राहिल्या नंतर सर्वात पहिले एक ग्लास पाणी पिणे चांगले राहील. ज्यामुळे पोटामध्ये थंडावा पोहचेल, आणि नंतर होणाऱ्या पचन संबंधित समस्या पासून वाचता येईल.

ज्यूस सेवन करणे

तुम्हाला वाटल्यास लिंबू पाणी, लस्सी, नारळपाणी किंवा मौसंबी ज्यूस घेऊ शकता. यामुळे तुम्हाला उर्जा येईल आणि यामुळे तुमची पचनसंस्था व्यवस्थित कार्य करण्यास सुरुवात होईल.

प्रोटीन वर लक्ष द्या

व्रत झाल्यानंतर प्रोटीन ने भरपूर असलेला आहार घेण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होण्यास यामुळे मदत होईल. यासाठी काही वेळाने तुम्ही पनीर किना अंकुरित आहार घेऊ शकता.

 

मसालेदार खाणे टाळावे

उपवास केल्यानंतर मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मिठाई आणि तळलेल्या पदार्था पासून देखील दूर राहावे. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर जास्त दबाव पडणार नाही आणि आरोग्य देखील चांगले राहील.

मल्टीग्रेन आटा

जर तुम्हाला वाटले तर तुम्ही वेगवेगळे धान्य एकत्र करून त्याचे पीठ तयार करून त्याच्या पोळ्या बनवू शकता. भाजी मध्ये दुधीभोपळा, भोपळा, टमाटर, भेंडी, डाळ आणि दही यासारखे पचायला हलके पदार्थ तुम्ही खाऊ शकता. दिवसभराच्या उपवासा नंतर तुमचे पचनतंत्र हे सहज पचवू शकते.

एनर्जी फूड खावे

उपवास सोडताना तुम्हाला हलका आणि लिक्विड आहार घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाटल्यास तुम्ही दही आणि त्यासोबत फळांचा वापर देखील करू शकता. याच सोबत फ्रूटचाट हा देखील एक चांगला विकल्प आहे, ज्यामुळे तुमचे पोट भरेल आणि शरीराला उर्जा मिळेल.

हलका आहार घ्या

अनेक दिवसानंतर जेव्हा उपवास सोडता त्यावेळी हेवी आहार घेणे टाळावे. उपवास सुरु असताना तुमची पचनक्रिया मंद झालेली असते. त्यामुळे एकदम हेवी पदार्थ खाणे टाळावे, उपवास सोडताना काही हलके फुलके खावे जसे मिक्स पीठा पासून बनलेला उपमा इत्यादी. हे पौष्टिक आणि पचनास हलका पर्याय राहील. पण लक्षात असू द्या उपवास सोडताना जे पण खावे कमी प्रमाणात खावे.


Show More

Related Articles

Back to top button