astrologydharmik

या कारणामुळे एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये, विज्ञान आणि आध्यात्म दोन्ही हेच मानतात

या जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येकाची आपआपली वेगळी श्रद्धा आहे. त्या धर्माचे पालन करणारे लोक धर्माचे नियम आणि मान्यता फॉलो करत असतात ज्यामुळे ईश्वर त्यांच्यावर प्रसन्न राहील. अगदी तसेच हिंदू धर्मामध्ये देखील काही मान्यता आणि श्रद्धा आहेत ज्यांना हिंदू लोक पालन करतात. ज्या गोष्टी धर्मा मध्ये वर्जित केलेल्या असतात त्या करणे टाळले जाते. त्या विरुध्द ज्या गोष्टी करण्यास सांगितले आहे त्या केल्या जातात. या मध्ये अनेक प्रकारच्या पूजा आणि व्रत शामिल आहेत.

भगवान विष्णूचे सर्वात प्रिय व्रत आहे एकादशी

हिंदू धर्मा मध्ये या व्रताला अत्यंत महत्व आहे. प्रत्येक वर्षी 24 एकादशी असतात. पण ज्यावर्षी अधिक मास असतो त्यावर्षी 26 एकादशी येतात. एकादशी बद्दल बोलले जाते कि भगवान विष्णूंचे हे सर्वात प्रिय व्रत आहे. त्यामुळेच भगवान विष्णूचे भक्त एकादशी व्रत करतात आणि त्यांच्या सर्व अवतारांचे ध्यान करून पूजा-पाठ करतात.

एकादशीच्या दिवशी सात्विकता आवश्य असते

प्रत्येक व्रताचे आपले असे काही खास नियम असतात. त्याच प्रमाणे एकादशी व्रताचे देखील काही नियम आहेत. ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या दिवशी सात्विकता पाळणे आवश्यक आहे. याचा अर्थ एकादशी व्रत करणाऱ्या लोकांनी लसून, कांदे, मांसाहार इत्यादी सेवन करू नये. याच सोबत एकादशी व्रता मध्ये भात खाऊ नये. एकादशीच्या दिवशी भात खाण्यास बंदी का आहे? या मागे काय कारण आहे? चला आज या बद्दल जाणून घेऊ.

भात खाणे हे महर्षी मेधाच्या रक्ताचे सेवन करण्या समान

तुमच्या माहितीसाठी पौराणिक कथा मध्ये या बद्दल सांगितले आहे. या अनुसार माता शक्तीच्या क्रोधा पासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी शरीर त्याग केले आणि त्यांचा अंश पृथ्वी मध्ये गेला. यानंतर महर्षी मेधा भात आणि जौ च्या रुपात पृथ्वीवर उत्पन्न झाले. हे कारण आहे कि भात (तांदूळ) आणि जौ यांना जीव मानले जाते. महर्षी मेधा यांचा अंश ज्या दिवशी पृथ्वी मध्ये समाविष्ट झाला त्या दिवशी एकादशी होती तांदूळ आणि जौ यांना जीव मानले जाते त्यामुळे यादिवशी त्यांना खाणे वर्जित आहे. असे मानले जाते कि भात खाणे हे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्त सेवन करण्या समान आहे.

पण हे तर झाले एकादशीच्या दिवशी भात न खाण्याचे धार्मिक कारण आता विज्ञानाच्या नुसार एकादशीच्या दिवशी भात का खाऊ नये हे जाणून घेऊ. विज्ञाना नुसार भातामध्ये पाणी सर्वात जास्त मात्रेत असते. याच्या सेवनामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे व्यक्तीचे मन चंचल आणि विचलित होते. यामुळे एकादशीच्या व्रता मध्ये त्याचे मन लागत नाही. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात. यामुळेच एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये.


Tags
Show More

Related Articles

2 Comments

    1. Hi Ashwini,

      खालील युट्युब लिंकवर सुंदर ऑडीओ बुक आहे तो तुम्ही पहा. तुम्हाला 101 % फायदा होईल जर तुम्ही त्यामधील टिप्स फॉलो केल्यातर. या पुस्तकास तुम्ही एमेझोनवर खरेदी देखील करू शकता.

      https://youtu.be/7PRjq7FqccE

Back to top button