फक्त 4 तांदळाचे दाणे बदलू शकते तुमचे नशीब, जाणून घ्या कसे

तांदूळ एक प्रकारचे धान्य असते आणि याचा वापर पूजे मध्ये अक्षता म्हणून केला जातो. तांदूळ म्हणजेच अक्षता आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानले गेले आहे आणि त्यामुळे याचा वापर पूजा साहित्यात केला जातो. तांदूळ हे एक असे धान्य आहे जे कोणत्याही देवी आणि देवतांना अर्पित केले जाऊ शकतात. कारण असा कोणताही देव किंवा देवी नाही ज्यास अक्षता अर्पित करणे वर्जित आहे. त्यामुळे कोणत्याही देवाची पूजा करताना निसंकोचपणे अक्षतांचा वापर पूजेत करता येतो. असे असले तरी अक्षता अर्पित करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

अक्षता अर्पित करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

पूजा करताना देवाला अर्पित करत असलेले तांदूळ किंवा अक्षता बिलकुल तुटलेले किंवा खंडित झालेले नसावेत. तुकडा पडलेले अक्षता देवाला अर्पित करणे शुभ मानले जात नाही. यामुळे पूजेचे पूर्ण फलप्राप्ती आपल्याला होत नाही. तसेच पूजेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या अक्षता पूर्णतः पांढरे असावेत. कधीही पिवळे पडलेले किंवा रंगीत अक्षता पूजे मध्ये वापरू नयेत.

आपण दररोज पूजा करताना देवाला अक्षता अवश्य अर्पित केल्या पाहिजेत. रोज देवाला तांदूळ अर्पित केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमी होणार नाही. त्यामुळे आपण रोज सकाळी पूजा करताना फक्त चार अखंडित अक्षता देवाला अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी देवाला वाहिलेले या अक्षता आपण पक्षांना खाण्यास देऊ शकता.

पूजा करताना आपण वापरत असलेले तांदूळ एकदम स्वच्छ असावे त्यामध्ये माती किंवा खडे नसावेत. पूजेला वापरत असलेले तांदूळ नेहमी वेगळे ठेवले पाहिजे आणि यांना आपण खात असलेल्या तांदळाच्या सोबत ठेवू नये.

शिवलिंगाची पूजा करताना आपण अक्षता अवश्य अर्पित कराव्यात आणि अक्षता अर्पित करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. भगवान शंकराला अर्पण करत असलेल्या अक्षता अखंडित असल्याची खात्री मात्र करून घ्यावी. जर आपण प्रत्येक सोमवारी फक्त चार अक्षता देखील शिवलिंगावर अर्पित केल्या तर आपल्या मनोकामना पूर्ण होतील.

पूजेच्या वेळी अक्षता अर्पित का केल्या जातात

तांदूळ हे सगळ्या प्रकारच्या अन्नामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तांदळाचा रंग पांढरा असतो जे शांतीचे प्रतीक आहे. जे आपण यास देवाला अर्पित करतो तेव्हा आपण जीवनात शांती आणि आपल्या जीवनामध्ये कधीही अन्नाची कमतरता होऊ नये अशी इच्छा करतो. याच सोबत असे बोलले जाते कि देवाला सगळ्यात जास्त प्रिय धान्य तांदूळ आहे आणि तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पित केल्याने ते खुश होतात.

जर तांदूळ कुंकू सोबत अर्पित केले तर ते अधिक प्रसन्न होतात आणि आपली पूजा स्वीकार करून आपल्याला फलप्रदान करतात. कोणतीही पूजा अक्षते शिवाय अपूर्ण मानली जाते आणि पूजे मध्ये याचा वापर करणे अनिवार्य असते.