foodhealth

दुभंगलेले केस किंवा केसांना फाटे फुटले असतील तर त्यावर करा घरगुती उपाय

रासायनिक उत्पादने अधिक वापरणे, हेयर स्टाईलिंग मशीन वापरणे, सूर्याच्या हानिकारक किरणांच्या संपर्का मध्ये येणे, प्रदूषण आणि केसांची योग्य काळजी न घेणे या कारणामुळे केसांचे दुभंगणे (केसांना फाटे फुटणे) हि समस्या होऊ शकते. हि समस्या झाल्यामुळे सुंदरते मध्ये कमी तर आणतेच पण सोबतच केसांच्या आरोग्याला देखील प्रभावित करते.

दुभंगलेल्या केसांना न कापता पुन्हा सामान्य करणे कठीण असते पण तुम्ही या पासून वाचू शकता.यासाठी तुम्हाला केळ्याच्या काही हेयर मास्कचा वापर करावा लागेल. चला पाहू हा हेयर मास्क कसा बनवायचा.

कसा बनवावा बनाना हेयर मास्क

बनाना हेयर मास्क बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

एक पिकलेले केळे

दोन चमचे दही

गुलाब पाणी

लिंबाचा रस

कसा तयार करावा बनाना हेयर मास्क

सर्व साहित्य एकत्र करून त्यांना ब्लैंंड करा.

या पेस्टला डोक्या पासून ते केसाच्या टोका पर्यंत लावा.

30 मिनिट हेयर मास्क लावून ठेवा.

या नंतर शैम्पू करा आणि कंडीशनर करणे विसरू नका.

लवकर परिणाम होण्यासाठी आठवड्यातून एक वेळा हा प्रयोग करा.

बनाना एग हेयर मास्क बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

एक पिकलेले केळे

एक अंडे

एक चमचा नारळाचे तेल

तीन चमचे मध

कसे बनवावे हेयर मास्क

अंडे एका भांड्यात व्यवस्थित फेटून घ्या.

पिकलेले केळे त्यामध्ये मैश करा आणि पेस्ट बनवा.

केळ्याची पेस्ट अंड्याच्या पेस्ट मध्ये मिक्स करा.

यामध्ये नारळाचे तेल आणि मध मिक्स करा.

आपल्या केसांना डोक्या पासून ते मुळा पर्यंत हेयर मास्क लावा.

आता केस शावर कैप घालून झाकून ठेवा.

एका तासाने केस शैम्पू करा. आठवड्यातून एक वेळा हा हेयर मास्क लावा.

केसांच्यासाठी केळे कसे फायदेशीर आहे.

केळे केसांना मुलायम बनवण्यासाठी मदत करतात.

केसांचे गळणे कमी करतो आणि केसांची वाढ करतो.

केळ्याच्या हेयर मास्कच्या वापरामुळे केस निरोगी, घनदाट आणि मजबूत होतात.

दुभंगलेल्या केसांना चांगले करण्या सोबत हेयर डैमेज पासून वाचवतो.


Show More

Related Articles

Back to top button