health

काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय

चेहऱ्यावर आलेले काळे डाग तुमच्या सुंदरते मध्ये अडसर असतात. ज्यामुळे तुमचा चेहरा खराब दिसू शकतो. ज्याला कोणत्याही केमिकलचा वापर न करता दूर करणे शक्य आहे. काही सोप्प्या घरगुती उपायाच्या मदतीने हे सहज शक्य आहे.

त्वचेवर मेलेनिनच्या अतिरिक्त श्रावामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट, पैच आणि काळे डाग होऊ शकतात. मेलेनिनचे अतिरिक्त श्राव होण्या मागे सूर्याची प्रखर किरणे, हार्मोनचे असंतुलन, गर्भावस्था, काही औषधे, विटामिन, झोपेची कमी आणि अत्यंत जास्त तणाव यासारखी कारणे असू शकतात. चेहऱ्याला चमकदार बनवण्यासाठी आणि काळे डाग किंवा डार्क पैच सहज कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चला पाहूयात असेच काही घरगुती उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही काळे डाग कमी करू शकता.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसा मध्ये विटामिन सी असते जे काळे डाग आणि डार्क पैच कमी करण्यास मदत करतात. हे त्वचेला चमकदार सुध्दा करतात. एका भांड्यामध्ये लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये कापूस भिजवून त्याला आपल्या चेहऱ्यावर 30 मिनिट सोडून द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा चांगला धुवून घ्या. जर तुमची स्कीन जास्त सेन्सिटीव आहे तर लिंबाच्या रसा सोबत मध किंवा गुलाब जल मिक्स करा.

कच्चे बटाटे

कच्च्या बटाट्य मध्ये नेचुरल ब्लिचिंग प्रोपर्तीज असतात जे डाग, घाव आणि काळ्या खुणांना घालवण्यास मदत करतात. बटाट्याचे स्टार्च पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते, तसे यामध्ये असणारे एंजाइम्स त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते. बटाट्याचे तुकडे चेहऱ्यावर काळे डाग असलेल्या भागावर चोळावे यामुळे काळे डाग कमी होतील.

ताक ( Buttermilk )

काळ्या डागा पासून सुटका करण्यासाठी ताक सुध्दा अतिशय फायदेशीर आहे. लिंबाच्या रसा प्रमाणे हे काळ्या डागांना फिक्के करण्यास मदत करते. यामध्ये लैक्तीक एसिड असते जे हळूहळू त्वचेचे पीगमेंटेशन कमी करते आणि त्वचेचा रंग गोरा करते. ताक आणि टमाटर रस दोन्ही मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. कमीत कमी 15 मिनिट हा लेप असाच चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने चांगले धुवून काढा. या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतील.

एलोवेरा

एलोवेरा मध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात. याच्या जेल मध्ये पॉलीसैकेराइड असते जे काळ्या डागांना कमी करते आणि खुणांना बरे करते. हे त्वचेच्या सेल्स विकसित करण्यास मदत करते. एलोवेरा जेल डाग असलेल्या जागी लावा आणि 15-20 तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चांगले धुवून घ्या.

हळद

हळद स्कीन लाइटेनिंग एजेंट सारखे काम करते. जे चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करते. हे फ्री-रेडीकल्स रिपेयर करते आणि त्वचेच्या पिगमेंटेशनला कमी करते. हळद सूर्य किरणांमुळे झालेले डाग आणि रिंकल्स बरे करण्यासाठी प्रभावी आहे. हळद पावडर दुध किंवा लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून काळ्या डागावर लावावे. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि नंतर धुवून टाका. यामुळे काळे डाग कमी होतात.


Show More

Related Articles

Back to top button