Connect with us

पॅनकार्ड गुंतवणूकदारांसाठी खुशखबर

Money

पॅनकार्ड गुंतवणूकदारांसाठी खुशखबर

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पॅनकार्ड क्लब कंपनीच्या मालमत्ता जप्त केल्या असून सर्व गुंतवणुकदारांचे पैसे परत दिले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले.

मुख्य संचालक सुधीर मोरवेकर मृत

या कंपनीचा मुख्य संचालक सुधीर मोरवेकर मृत असून इतर सर्व संचालकांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे, लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पॅनकार्डच्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नाबाबत काँग्रेसचे सतेज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्यांनी उत्तर दिले. सरकारने आजपर्यंत या कंपनीवर कोणती कारवाई केली, सेबीने कंपनीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत काय, असा सवाल पाटील यांनी केला होता.

पॅनकार्ड क्लब कंपनीने टाइम शेअर्स विकले होते. यातून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. एकूण ५१ लाख गुंतवणूकदार असून त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आहेत.

सेबीने कंपनीच्या मालमत्तेबाबत विल्हेवाट लावू नये, अशी सूचना करून त्याची सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ५१ लाख गुंतवणुकदारांचे सात हजार ३५ कोटी रुपये तीन महिन्यांत परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवीन गुंतवणूक करण्यास प्रतिबंध करून मालमत्तेची विल्हेवाट न लावण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : उन्हाळ्यात घराच्या आतील तापमान थंड ठेवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top