healthPeople

पोटावर (पालथे) झोपल्याने होतात 5 भयंकर नुकसान, नंबर 3 मुळे तर सगळेच आहेत त्रस्त

आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक लहान-लहान गोष्टीकडे लक्ष ठेवावे लागते. पोषक तत्वांनी भरपूर पदार्थ खाण्या  पासून ते झोपण्याच्या पद्धती पर्यंत सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते तेव्हाच तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता. शरीरासाठी जेवढे आवश्यक अन्न आहे तेवढीच आवश्यक झोप आहे. परंतु काही लोक चुकीच्या पद्धतीने झोपतात आणि त्यामुळे त्यांना आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते.

हे खरे आहे कि रात्री 7 ते 8 तास झोप शरीरासाठी आवश्यक आहे. अपुरी झोप आरोग्यावर विपरीत परिणाम करते. फक्त झोपणेच नाही तर योग्य पोजिशन मध्ये झोपणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आराम करण्याची सवय असते. काही लोक पालथे (पोटावर) झोपून आराम करतात. पण पोटावर झोपल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हि सवय अनेक प्रकारचे हेल्थ प्रोब्लेम निर्माण करू शकतात. चला तर पाहू पोटावर झोपल्याने आरोग्याला काय काय नुकसान होऊ शकतात ते आपण पाहू.

बैक पेन : पोटावर झोपल्यामुळे पाठीचा कणा आपल्या नैसर्गिक स्थिती मध्ये राहत नाही. यामुळे बैक पेन प्रोब्लेम होतो. अश्या लोकांना बहुतेक वेळा कंबरदुखीचा त्रास होतो. जर तुम्हाला देखील हि समस्या होत असेल तर आपल्या झोपण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. कारण कंबरदुखी अतिशय वेदनादायक आणि असहनीय असते. काम करण्यामध्ये आणि उठण्या बसण्यामध्ये देखील त्रास होऊ शकतो.

मान दुखणे : पोटावर झोपल्याने शरीराचा रक्त संचार प्रभावित होतो. ब्लड सर्कुलेशन योग्य होत नाही. मान योग्य पद्धती मध्ये नसल्याने मान दुखीचा त्रास होतो.

डोकेदुखी : डोकेदुखीची समस्या एक सामान्य समस्या आहे. परंतु पालथे झोपल्यामुळे देखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण पोटावर झोपल्याने शरीराचा रक्त संचार प्रभावित होतो. ब्लड सर्कुलेशन योग्य होत नाही ज्यामुळे डोकेदुखी होते. हि समस्या वाढू देखील शकते. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आपल्या झोपण्याची पद्धत तपासून पहा.

पचनक्रिये मध्ये गडबड : पोटावर झोपल्यामुळे पचन संबंधित समस्या देखील होऊ शकतात. असे झोपल्यामुळे सहज अन्न पचन होत नाही. ज्यामुळे तुमच्या पचन क्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. ज्यालोकाना पालथे झोपण्याची सवय असते त्यांना पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

चेहऱ्यावर परिणाम : चेहऱ्याला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पाहिजे असते. जर ते मिळाले नाही तर मुरुमे आणि सुरकुत्या इत्यादी समस्या होतात. याच सोबत जेव्हा पोटावर पालथे झोपता तेव्हा चेहरा दबल्या जातो. यामुळे चेहऱ्याचा आकार बदलण्या सारखी समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला देखील पोटावर झोपण्याची सवय असेल तर ती त्वरित बदला अन्यथा विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

पाठीवर सरळ झोपणे फायदेशीर असते. यामुळे शरीर व्यवस्थित कार्य करते आणि आरोग्याशी संबंधित समस्या होत नाहीत. यामुळे पचन संबंधित समस्या देखील होत नाहीत.


Show More

Related Articles

Back to top button