पूजे मध्ये पती पत्नी सोबत बसने का असते शुभ, जाणून घ्या धार्मिक कारण

आपण जवळपास सगळ्याच पूजे मध्ये पती पत्नीला एकत्र पूजे मध्ये बसलेले पाहिले असेल. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यते अनुसार पती पत्नी कडून एकत्रित केलेल्या पुण्य लाभ जास्त मिळतो. तर लग्ना नंतर एकटे पूजा अर्चना केल्याने पूजेचे महत्व कमी होते. लग्ना नंतर फक्त पूजा पाठच नाही तर तीर्थस्थळी देखील देवदर्शन इत्यादी धार्मिक कर्म एकत्र केली पाहिजेत. चला जाणून घेऊ पती पत्नी ने एकत्रित पूजा का केली पाहिजे आणि याचे काय लाभ मिळतात.

पती पत्नी ने एकत्रित धार्मिक कार्य केल्याने मिळतात पुढील लाभ

  • धर्म कर्म एकत्रित केल्याने वैवाहिक जीवनात ताळमेळ चांगला करण्याची संधी मिळते. एकत्रित पूजा केल्याने आणि धार्मिक स्थळी यात्रेला जाण्याने नात्यात येत असलेले चढउतार आणि मतभेद कमी करण्यास मदत होते. पती पत्नीचे एकमेकातील प्रेम भाव वाढतो.

  • लग्नाचे फेरे घेतांना दिलेल्या वचना मध्ये एक असते कि विवाहानंतर कोणत्याही व्रत, धर्म-कर्म करण्यासाठी जाल तेव्हा मला देखील आपल्या सोबत घेऊन जावे. हेच कारण आहे कि लग्ना नंतर पती पत्नी ने एकटे पूजा नाही केली पाहिजे आणि एकट्याने कोणत्याही यात्रेला गेले नाही पाहिजे. एकटे पूजा केल्याने मानवांछित फळ मिळत नाही आणि एकट्याने केलेली यात्रा सफल देखील होत नाही.

  • असे मानले जाते कि एकट्याने पूजेत बसल्याने मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता कमी होते. जर मनोवांच्छित फळ प्राप्त करायचे असेल तर आपल्याला दोघांना एकत्रित पूजेला बसले पाहिजे.

  • आपण धार्मिक ग्रंथांकडे लक्ष दिले तर असे अनेक उदाहरण मिळतील जेथे स्त्री ही पुरुषांची शक्ती मानली गेली आहे. मंग राधा-कृष्ण असो किंवा लक्ष्मी नारायण, देवतांच्या पहिले त्यांच्या शक्ती चे नाव घेतले जाते. पत्नी शिवाय पती द्वारे केलेले धार्मिक काम अपूर्ण मानले जातात.