health

खरोखरच कोणीतरी आठवण करत असल्यावर उचकी येते का? जाणून घ्या याचे कारण आणि ठीक करण्याचे उपाय

जेव्हा कोणाला उचकी लागते तेव्हा तुम्ही बहुतेक वेळा लोकांना बोलताना ऐकले असेल कि कोणी तरी आठवण करत असेल पण तुम्हाला देखील खरच असेच वाटते का? सामान्यतः जेव्हा कोणाला उचकी लागते तेव्हा असाच अंदाज लावला जातो पण मेडिकल सायन्स प्रमाणे उचकी येण्याचा अर्थ काही वेगळाच असतो. जेवढे लोक तेवढ्या गोष्टी असतात पण मेडिकल सायन्स त्याच गोष्टींवर विश्वास ठेवतो जे त्यांना रिसर्च दरम्यान मिळतात. भारता मध्ये उचकी लागण्याचा संबंध सरळ कोणीतरी आपली आठवण काढण्या सोबतच लावला जातो पण यामागील खरे कारण काही वेगळे आहे. चला पाहू उचकी येण्या मागील खरे कारण काय असते आणि उचकी थांबवण्यासाठी कोणते उपाय करता येतात.

खरोखरच कोणीतरी आठवण करत असल्यावर उचकी येते का?

मेडिकल सायन्स अनुसार उचकी येणे एक समस्या (आजार) असतो. कधीकधी उचकी येणे सामान्य असते पण एखाद्याला नेहमी उचकी येत असेल तर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा काही घरगुती उपाय केले पाहिजेत. जर घरगुती उपायाने फायदा मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. उचकी येण्याचे ठोस कारण तर मेडिकल सायन्सकडे नाही पण अचानक उचकी येणे आणि नंतर ठीक होणे हे आरोग्या बद्दल सांगते. पण असेही मानले जाते कि आपण घाईघाईने काही खाल्ले प्यायले तर त्याचे काही कण फुफुसा मध्ये जातात ज्यामुळे छाती मध्ये हलकेसे दुखणे आणि उचकी बनून बाहेर पडणे हे होते. काही वेळा अचानक उचकी लागते ज्याचे काही वेगळे कारण असतात जी पाणी पिण्या नंतर दूर होते. चला आता पाहू उचकी थांबवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येतात.

उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय

जेव्हा तुम्हाला उचकी लागते तेव्हा एक घोट पाणी प्यावे. जर जास्त उचकी येत असेल तर एक ग्लास पाणी व्यवस्थित प्यावे. यामुळे तुमची उचकी येणे थांबू शकते.

मेडिकल सायन्स अनुसार डायफ्राम आकुंचन झाल्यामुळे उचकी येते. अश्यावेळी काही सेकंदासाठी आपला श्वास थांबवावा यामुळे फुफुसामध्ये कार्बनडाय ऑक्साईड भरून जाईल ज्यामुळे डायफ्राम त्याला काढण्यासाठी मदत करेल. डायफ्राम कार्यरत झाल्यामुळे उचकी येणे बंद होईल.

उचकी येत असल्यास त्यावेळी थोडी साखर खाण्यामुळे आराम मिळेल. जर उचकी वेगाने येत असेल तर साखर, मीठ आणि पाणी यांचे मिश्रण प्यावे. काही वेळात उचकी बंद होईल.

जास्त उचकी येत असल्यास एक चमचा लिंबू रसामध्ये मध मिक्स करून प्यावे त्यामुळे उचकी मध्ये आराम मिळेल.

उचकी आल्यावर चॉकलेट पावडर, साखर किंवा काळीमिरी खाऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

उचकीचे प्रमाण जास्त असेल आणि उपाय करून देखील जर थांबत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Show More

Related Articles

Back to top button