viral

काय हे मृतदेह आतंकवाद्यांचे आहेत, फॉरवर्ड करण्याच्या अगोदर जाणून घ्या सत्य काय आहे

पीओके (पाकिस्तान च्या ताब्यातील कश्मीर) मध्ये भारताच्या एयर स्ट्राइक नंतर तेथे मेलेल्या आतंकवाद्यांची संख्या किती या बद्दल विपक्ष सतत विचारणा करत आहे. याबद्दल सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे कि वायुसेनेच्या कारवाई मध्ये जवळपास 300 आंतकवाडी मारले गेले, तर पाकिस्तान ने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे म्हंटले आहे. यासगळ्याच्या दरम्यान सध्या सोशल मीडिया वर डेड बॉडीजच्या काही फोटोज वायरल होत आहेत, ज्यांना आतंकवाद्यांचे असल्याचे म्हंटले जात आहे, जे पीओके मध्ये भारताच्या कारवाई दरम्यान मारले गेले असल्याचे बोलले जात आहे पण या फोटोंचे सत्य काही वेगळेच आहे.

हे आहे वायरल होत असलेल्या फोटोंचे सत्य

सोशल मीडिया वर जे फोटो वायरल होत आहेत, त्यामध्ये अनेक डेड बॉडीज ठेवलेल्या आहेत, ज्यांना दफन करण्याची तयारी होत आहे. या फोटोंना शेयर करताना जे कैप्शन लिहले गेले आहे, त्यामध्ये लिहले आहे, ‘सबूत मांगने वालो ये राहा सबूत, देख लो और पहचान लो तुम्हारे बाप को.’ शेयर करणारे लोक त्यांना बालाकोट मध्ये मेलेले आतंकवादी सांगत आहेत. त्यांच्या प्रमाणे हे फोटो हल्लीच भारता कडून जैश च्या ठिकाणांवर केलेल्या कारवाई नंतरचे सांगितले गेले आहे.

पण या फोटोज चे सत्य काही वेगळे आहे, शेयर होत असलेले हे फोटोज काही वर्षा पूर्वीची आहेत आणि बालाकोट मधील नसून कराची मधील आहेत. खरतर जून 2015 मध्ये पडलेल्या भयानक उष्णते मुले कराची मध्ये एवढे जास्त लोक मरण पावले होते कि त्यांना सामूहिक दफन करण्यात आले होते.

रमजान च्या दरम्यान कराची चे तापमान 45 डिग्री च्या पार झाले होते, सोबतच वीजेची कटौती सतत होत होती. ज्यामुळे येथे एवढे जास्त लोक मरण पावले होते. त्यादरम्यान झालेल्या डेड बॉडीजला आता काही लोक बालाकोट मधील एयर स्ट्राइक च्या दरम्यान मेलेल्या लोकांचे फोटो असल्याचे सांगून शेयर करत आहेत. जे पूर्णतः असत्य आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामा मध्ये CRPF च्या बस वर जैश ने आत्मघाती हल्ला केला होता. ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेने ने पीओके मधील बालाकोट मध्ये एयर स्ट्राईक करून जैश च्या आतंकी अड्ड्यांना उध्वस्त केले होते. ज्यामध्ये अनेक आतंकी ठिकाणे बेचिराख झाल्याची आणि शेकडो आतंकवादी मेल्याची खबर होती.


Show More

Related Articles

Back to top button