Breaking News

सलमान खान सोबत ‘रेडी’ चित्रपटा काम केलेल्या अभिनेत्याने अवघ्या 27 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

सलमान खान (Salman Khan) याचा ‘रेडी’ चित्रपट सुपरहिट झाला होता तसेच यातील कलाकार देखील प्रसिद्ध झाले होते. त्यापैकीच एक अभिनेता मोहित बघेल हा देखील होता. मोहित हा फक्त 27 वर्षांचा होता. त्यास कर्करोगाने ग्रासले होते. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ शो चे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करून मोहित बघेल यांच्या निधनाची बातमी सर्वाना कळवली आहे.

ready-actor-mohit-baghel-passes-away
ready-actor-mohit-baghel-passes-away

मोहित यास लहानपणा पासूनच कर्करोग होता. मोहित मूळचा उत्तर प्रदेश मधील एका गरीब कुटुंबातील होता. बॉलिवूड मध्ये करिअर करण्यासाठी तो मुंबई मध्ये आला होता. मोहित ने ‘छोटे मिया’ या कॉमेडी शो मधून पदार्पण केले होते.

मोहित अखेरच्या दिवसात नोएडा मधील एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता. पण अखेर कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे तो अपयशी ठरला.

सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटा मध्ये मोहित ने ‘छोटे अमर चौधरी’ ची भूमिका केली होती. त्याची ही भूमिका सर्वांच्या पसंतीस देखील आली होती. त्याच्या अवेळी निधनामुळे त्याची फिल्मी करियर मोठे यश मिळवण्या अगोदरच संपली आहे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.