food

5 शाकाहारी फूड जे चिकन आणि मटन पेक्षा जास्त ताकत देतात, जाणून घ्या कोणते आहेत हे सुपरफूड

याबाबतीत कोणतेही दुमत नाही की चिकन आणि मटन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. यावस्तूंना खाण्याचा सल्ला सर्वात जास्त त्यालोकांना दिला जातो जे सर्वात जास्त मेहनत करतात जसे खेळाडू, पहिलवान, कामगार, बॉडी बिल्डर, जिम ट्रेनर इत्यादी. पण काही लोक चिकन मटन पोषण म्हणून नाही तर आवड म्हणून खातात. तर काही लोकांना गैरसमज आहे की जेवढे प्रोटीन चिकन मटन मध्ये आहे तेवढे कोणत्याही वेज फूड मध्ये नाही पण खरतर तसे नाही आहे. आज आम्ही तुम्हाला काही असे व्हेज फूड सांगणार आहोत जे नॉनव्हेज फूड एवढेच पौष्टिक आहेत. आणि त्यांच्यामध्ये प्रोटीन, फैट आणि विटामिन आहे.

बादाम

बादाम मध्ये सर्वात जास्त प्रोटीन आणि पोषक तत्व असतात. फक्त 100 ग्राम बादाम मध्ये 3.7 मिली आयरन, 12 ग्राम फाइबर आणि 264 मिली कैल्शियम असते. याच सोबत बादाम मध्ये फैट, विटामिन आणि मिनिरल असतात.

सोयाबीन

जेवढे प्रोटीन सोयाबीन मध्ये असते क्वचितच तेवढे चिकन आणि मटन मध्ये असेल. कदाचित तुम्हाला माहित नसेल पण फक्त 100 ग्राम सोयाबीन मध्ये 36 ग्राम प्रोटीन, 15.7 मिली आयरन, 9 ग्राम फाइबर आणि 277 मिली कैल्शियम असते.

भोपळ्याच्या बिया (बीज)

दररोज भोपळ्याच्या बिया खाण्यामुळे आपल्याला हृदयरोग, शुगर, झोप न येणे, तणाव या सारख्या आजारा पासून सुटका मिळते. डॉक्टरांच्या अनुसार जर तुम्ही दररोज एक चमचा भोपळ्याचे बीज सेवन केले तर तुम्ही हेल्दी लाईफ जगू शकता.

खसखस

खसखस हा एक पोष्टिक पदार्थ आहे. याचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून करतो. खसखस मध्ये आयरन, फाइबर आणि कैल्शियम भरपूर असते. खसखसचे सेवन लोक जास्त थंडी मध्ये करतात.

जवस

जवस अत्यंत पौष्टिक आहे. जवस मध्ये लिगनेंस एंटीऑक्सीडेंट्स असते जे आपल्याला कैंसर,डायबेटीस आणि हार्ट प्रोब्लेम सारख्या आजारा पासून वाचवते. जवस मध्ये आयरन, फाइबर, कैल्शियम, प्रोटीन आणि विटामिन B6 मोठ्या प्रमाणात असते. यास नियमित सेवन केल्याने अनेक आजारा पासून वाचता येऊ शकते.


Show More

Related Articles

Back to top button