dharmik

रावणाने मरताना लक्ष्मणास सांगितलेल्या ज्ञानाच्या या 3 गोष्टी, तुम्ही देखील जीवनात अवलंबल्यास बनाल सुखी

हिंदू धर्माच्या अनुसार दोन युध्द फार प्रसिध्द आहेत एक महाभारत आणि दुसरे रामायण आणि या दोन्ही युद्धामध्ये सत्याचा विजय झालेला आहे. असे प्रत्येक ठिकाणी होते कि वाईट पणा किंवा खोटेपणा कितीही शक्तिशाली असले तर शेवट हा नेहमी गोडच असतो आणि सत्याची आणि चांगुलपणाचा विजय हा नेहमी होतोच भलेही त्यास कदाचित उशीर लागेल पण अंतिम विजय हा सत्याचाच असतो.

सगळ्यांना माहित आहे कि रावण हा किती जास्त शक्तिशाली आणि ज्ञानी होता पण तो वाईट मार्गाला होता आणि हि त्याची सर्वात मोठी चूक होती. तरीही भगवान श्रीराम यांनी आपला लहान भाऊ लक्ष्मण यास रावणाकडे ज्ञान घेण्यास पाठवले होते कारण त्यांना माहित होते कि रावण हा किती ज्ञानी आहे. मरताना रावणाने लक्ष्मणास तीन गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टीना ज्याने आपल्या जीवनामध्ये फॉलो केल्या समजा त्याचे जीवन सार्थकी लागले आणि त्याचे जीवन आनंदाने भरून गेले.

 

मरताना रावणाने लक्ष्मणास सांगितलेल्या या 3 गोष्टी

रावण हा एक अहंकारी राक्षस होता ज्यास आपल्या शक्ती आणि बुद्धीवर अहंकार होता पण त्याने आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची पत्नी सीता माता यांचे हरण केले. तेव्हापासूनच त्याच्या जीवनाचा उलटा क्रम सुरु झाला आणि त्याचा अहंकारच त्याला घेऊन बुडाला. आपल्या कर्माची फळे प्रत्येकाला येथेच भोगावी लागतात आणि हेच रावणाच्या सोबत देखील झाले. पण तो ज्ञानी होता त्यामुळे भगवान श्रीराम यांनी आपल्या भावास म्हणजेच लक्ष्मणास त्याच्या जवळ ज्ञान घेण्यास पाठवले आणि त्याच गोष्टी जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये अवलंबल्या तर तुम्हाला देखील जीवनामध्ये यश मिळेल.

जेव्हा रावणाला बाण लागला होता तेव्हा श्रीराम लक्ष्मणास म्हणाले कि रावणाकडे जाऊन ज्ञान ग्रहण कर. त्यानंतर रावणाने लक्ष्मणास तीन गोष्टी सांगितल्या.

1. जीवनामध्ये आपण जे शुभ काम करण्याचा विचार केलेला आहे ते लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजेत आणि अशुभ काम करण्यासाठी जेवढे टाळता येईल तेवढे टाळले पाहिजे. अन्यथा जीवनामध्ये पश्चाताप करावा लागू शकतो जसे मी श्रीराम यांना ओळखण्यात चूक केली आणि माझी हि अवस्था झाली.

वाचा : रावणाला करायची होते हि कामे त्याच वध झाल्याने अर्धवट राहिली कामे

2. रावणाने लक्ष्मणास दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे तुम्ही कितीही शक्तिशाली असले तरी कधीही आपल्या शत्रूला कमी समजू नका. मी हनुमानास एक वानर समजून सर्वात मोठी चूक केली आणि माझी हि अवस्था झाली.

3. रावणाने तिसरी गोष्ट हि सांगितली कि जीवनामध्ये कधीही कोणासही आपले रहस्य सांगू नका कारण असे केल्यामुळे तुमचे नुकसान होईल. कोणीही कितीही चांगला असला तरी तुम्ही हि चुकी करू नका. कारण मी माझ्या लहान भावाला आपले रहस्य सांगितले आणि त्याचमुळे मी मरणासन्न झालेलो आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button