astrology

वध झाल्यामुळे अर्धवट राहिली रावणाची हे 7 कामे, अन्यथा आज जग काही वेगळेच असते

भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता हे तर सर्वांनाच माहित आहे. हे देखील माहित आहे कि देवतांना पराजित करणारा रावण हा महापंडित आणि महाज्ञानी होता, पण रावणाची सर्वात मोठी कमजोरी होती त्याचा अहंकार ज्यामुळे तो स्वतःला देव मानू लागला होता आणि ईश्वराने बनवलेले नियम बदलू पाहत होता. त्यामुळे तो स्वतःला सर्वात वेगळा आणि चांगला मानत होता. जर रावणाने सीता मातेचे हरण केले नसते तर तो भगवान राम यांच्या हातून मारला गेला नसता तर त्याने हे 7 कामे आवश्य पूर्ण केली असती. रावणाचा वध झाल्यामुळे त्याची हि 7 कामे अर्धवट राहिली, तुम्ही पण जाणून घ्या कोणती आहेत हि कामे जी रावणाने केली असती तर आज पृथ्वीचे रूप काही वेगळेच असते.

रावणाची हि 7 कामे अर्धवट राहिली

१. रावण आपल्या काळी स्वर्गा मध्ये एक सीढी बनवू इच्छित होता. त्याची इच्छा होती कि प्रत्येक व्यक्तीने स्वर्गा मध्ये जावे यासाठी तो जमिनी पासून ते स्वर्गा पर्यंत सीढी बनवण्याचे काम स्रुरू केले होते. पण जो पर्यंत हि सीढी बनून तयार होण्या अगोदरच त्याचा वध झाला

२. रावणाला समुद्राचे पाणी गोड करायचे होते. रावणाला माहित होते कि येणाऱ्या काळामध्ये जमिनीवर पाण्याची समस्या वाढेल आणि जर समुद्राचे पाणी पिण्या योग्य झाले तर पाण्याची समस्या कधी होणारच नाही.

३. रावण सोन्यामध्ये सुगंध आणू इच्छित होता. रावणाला सुवर्ण धातू प्रिय होते म्हणून तर त्याची लंका सोन्याची होती. त्याला वाटत होते कि सुगंधा वरून ओळखता यावे कि कोठे सोन्याची खान आहे.

४. रावण स्वतः काळा होता पण तो रंगभेद संपवू इच्छित होता त्यामुळे तो सर्वाना गोरा पाहू इच्छित होता ज्यामुळे कोणीही त्याच्या काळ्या रंगामुळे चेष्टेचा विषय बनू नये.

५. रावणाला रक्ताचा रंग लाल वरून पांढरा करायचा होता असे याकरिता कि जर कोणीही कोणाची हत्या केली तर कोणास शक होऊ नये.

६. रावणाची इच्छा होती कि मद्य गंधहीन व्हावे ज्यामुळे कोणीही त्याचा स्वाद घेऊ शकेल. रावणास मद्य आवडत होते पण त्याचा वास त्याला बिलकुल पसंत नव्हता.

७. रावणाची इच्छा होती कि जगामध्ये सर्व देवाची पूजा बंद करण्यात यावी आणि संपूर्ण जगाने फक्त त्याचीच पूजा करावी. पण त्याचे हे स्वप्न त्याचा वध होताच तुटले.


Show More

Related Articles

Back to top button