astrology

राशिभविष्य 8 जून 2018 : आज ग्रह बदलत आहेत आपली चाल, या 5 राशी होणार मालामाल

आज शुक्रवार 8 जून चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुमचा आनंदीपणा नष्ट करेल. मित्र महत्त्वाचे असतात. पण आज तुमचे स्टेटस ‘बिझी’ असेच ठेवा कारण कामाच्या ठिकाणी तुमचा आज अत्यंत धावपळीचा दिवस असणार आहे. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या जोडीदाराशी झालेल्या वादामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यातील बंध सैल झाले आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल.

वृषभ राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाच्या संधी शोधाल. जर तुम्ही कुणालातरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.

मिथुन राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधाना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा.

कर्क राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. चैनीच्या वस्तु आणि करमणुकीसाठी अतिखर्च करू नका. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. आज तुम्हाला दिलेली प्रत्येक सूचना तुम्ही टीका म्हणून घ्याल, जी तुमचा मूड घालवेल. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल.

सिंह राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. तुमचे प्रेम असफल ठरेल. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला मिळणार आदर थोडासा कमी होऊ शकेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.

कन्या राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.

तुल राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल – जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे.

धनु राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टींवरुन टोकणे टाळावे. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

मकर राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे.

कुम्भ राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

दु:खी कष्टी आणि निराश होऊन खिन्न होऊ नका. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकीर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.

मीन राशी भविष्य (Friday, June 08, 2018)

आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणा-या मार्केटींग यांसारख्या क्षेत्रात काम करावे. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.

आमचे सर्व मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आर्टिकल प्रसिद्ध होताच वाचण्यासाठी आमचे Android App खालील लिंक वरून त्वरित डाऊनलोड करा.

Marathi Gold Live


Show More

Related Articles

Back to top button