Connect with us

राशिभविष्य 7 जून 2018 : ग्रहांची चाल सुधारेल 5 राशींचे नशीब, 3 राशींचा बिघडवेल खेळ

Astrology

राशिभविष्य 7 जून 2018 : ग्रहांची चाल सुधारेल 5 राशींचे नशीब, 3 राशींचा बिघडवेल खेळ

आज गुरुवार 7 जून चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की, त्यात काहीही वावगे नाही.

वृषभ राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. आज तुमचा फायदा होईल – कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या प्रतिसाद देतील. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

मिथुन राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसºया कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. आज खूप सुंदर दिवस आहे. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. प्रेम आणि चविष्ट पदार्थ ही चांगल्या वैवाहिक आयुष्याची मूल तत्वे आहेत; आणि आज तुम्हाला त्याचाच अनुभव येणार आहे.

कर्क राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

भविष्याची निष्कारण चिंता तुमचा मूड खराब करेल. विनाकारण भविष्याची चिंता करण्यात वेळ घालविण्याऐवजी वर्तमानाची मजा घेण्यात खरा आनंद आहे हे पक्कं ध्यानात ठेवा. अंध:कार आणि शांततेचे प्रत्येक क्षण हे स्वत:चे अस्तित्व, आश्चर्य घेऊन वावरत असतात. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. एकतर्फी प्रेमावर वेळ वाया घालवू नका. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही बाबतीत तक्रार करू नका. आज तिचा/त्याचा मूड ठीक नाही. तक्रार केल्याने परिस्थिती अजूनच बिघण्याची शक्यता आहे.

सिंह राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

आरोग्य एकदम चोख असेल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक आघाडीवर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. पण कुटुंबातील इतर सहका-यांच्या मदतीने त्यातून मार्ग काढू शकाल. जीवनाचा हा अविभाज्य भाग आहे, कोणालाच तो चुकला नाही. समृद्धी अथवा वाईट काळ कोणाच्याही आयुष्यात कायमचा नसते. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. खूप अल्पसे अडथळे येतील – परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते – काही सहका-यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करीत नाहीत. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.

कन्या राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पु-या करण्याची काळजी घेईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचा/तुमची जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल.

तुल राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. आज तुमचे वर्चस्व असणारा दिवस नाही किंवा नवीन कामास सुरुवात करू नका, त्रास ओढवून घ्यावा लागेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे व्यवसाय-धंद्यामध्ये नव्या संकल्पनांना सकारात्मक आणि ताबडतोब प्रतिसाद द्या. ते तुमच्या हिताचे ठरेल. नव्या संकल्पना तुमच्या मेहनतीने प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही व्यवसाय-धंद्यात टिकून राहाल. रस घेऊन काम करण्यासाठी शांत राहा. स्थिर राहा. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. तुमचे वरिष्ठ तुमचे मुद्दे आज समजून घेऊ शकत नाहीत, पण संयम ठेवा, भविष्यात त्यांना तुमचे मुद्दे पटतील. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

धनु राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे दुस-या दिवशी त्रासदायक ठरू शकते. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याचे नशिबाचे भोग टळतील. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल.

मकर राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

ताणतणावावर मात करण्यासाठी शांत आराम देणारे संगीत ऐका. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. पत्नीबरोबर सहलीला जाण्यासाठी दिवस खूपच चांगला आहे. तुमचा मूडही बदलेल आणि तुमच्या दोघांतील गैरसमज दूर होण्यासही त्याचा उपयोग होईल. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. रोमान्सचा असीम आनंद घेण्यास तयार राहा.

मीन राशी भविष्य (Thursday, June 07, 2018)

आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करणे कमी केले नाही तर तुम्ही कामाच्या ठिकाणी कदाचित घोडचूक कराल. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.

आमचे सर्व मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आर्टिकल प्रसिद्ध होताच वाचण्यासाठी आमचे Android App खालील लिंक वरून त्वरित डाऊनलोड करा.

Marathi Gold Live

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top