राशीफळ : आज बनत आहे विशेष योग, या 6 राशींसाठी आहे अत्यंत शुभ

आम्ही तुम्हाला बुधवार १४ ऑगस्ट चे राशीफळ सांगत आहोत. राशीफळाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे. राशीफळ आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांची चाहूल करून देते. राशीफळाचे निर्माण ग्रह गोचर आणि नक्षत्रांची चाल यांच्या आधारावर केली जाते. प्रतिदिन ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर प्रभाव पाडत असते. या राशीफळामध्ये आपली नोकरी, व्यापार, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच आपले स्वास्थ्य याबद्दलची माहिती मिळेल. जर आपल्याला हि आजचा दिवस कसा राहील हे जाणून घेण्याची इच्छा असेल तर वाचा Rashifal 14 Aug 2019

मेष राशि (Aries) च, चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ :

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्टी आहे ती वापरा. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमँटिक असणार आहे.

 

वृषभ राशि (Taurus) ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो ब बो :

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही.

मिथुन राशि (Gemini) का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह :

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभुतीदेखील जाणवेल. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे.

कर्क राशि (Cancer) ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो :

इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. तुमच्याकडे उच्च ऊर्जाक्षमता आहे ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. वीज खंडीत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मदतीला येईल.

सिंह राशि (Leo)मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे :

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. तुम्ही आयुष्यभर प्रेम केलेत तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कन्या राशि (Virgo) ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो :

तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. घरीकाम करणारा चाकर/मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल.

तुला राशि (Libra) रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते :

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.

वृश्चिक राशि (Scorpio) तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू :

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाºयांना राग येऊ शकतो – कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

धनु राशि (Sagittarius) ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे :

मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

मकर राशि (Capricorn) भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी :

विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅण्टीक करण्याचा पुरेपुर प्रयत्ना करा. तुमच्याकडे नेतृत्वगुण आहेत आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता आहे – तुमच्या मनातील ख-या भावना प्रकट करा आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल. लोकांची मने जिंकून घ्याल. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.

कुंभ राशि (Aquarius) गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा :

अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.

मीन राशि (Pisces) दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची :

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल.

आपण Rashifal १४ ऑगस्ट २०१९ मध्ये सगळ्या राशींचे rashifal वाचले. आपल्याला Rashifal 14 Aug 2019 चे हे rashifal कसे वाटले? कमेंट करून आपला अभिप्राय आवश्य द्या आणि हे राशीफळ आपल्या मित्रांच्या सोबत शेयर करण्यास अजिबात विसरू नका.

नोट : आपल्या कुंडली आणि राशी ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि Rashifal 14 Aug 2019 मध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी कोणत्याही तज्ञ ज्योतिषीला भेटू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here