Connect with us

राशिभविष्य 26 में 2018 : शनिदेवाची कृपा या 4 राशींना होईल अत्यंत लाभ आणि 2 राशींना होईल त्रास

Astrology

राशिभविष्य 26 में 2018 : शनिदेवाची कृपा या 4 राशींना होईल अत्यंत लाभ आणि 2 राशींना होईल त्रास

राशीभविष्य आपल्या जीवना मध्ये महत्वाचे आहे. राशी अनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याच्या निगडीत अनेक माहिती प्राप्त होऊ शकते. ग्रह गोचर आणि नक्षत्र चाल यांच्या आधारावर राशिभविष्य निर्माण होते. ग्रहांची चाल नेहमी बदलत असते. यामुळे आपल्या दैनिक जीवनात घडणाऱ्या घटना देखील एकसारख्या नसतात. आज शनिवार 26 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते तुम्हाला काहीच मान्य होणार नाही – परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

वृषभ राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. चढउतारांमुळे फायदा होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. तुमचे आयुष्य आज खरच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे.

मिथुन राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. हुशारीने गुंतवणूक करा. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो/ती यासाठी खरच लायक आहे.

कर्क राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

 

सिंह राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

आजच्या दिवशी प्रवास टाळा, कारण त्यामुळे केवळ ताणतणाव आणि चिंता निर्माण होतील. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

कन्या राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाºया आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदर्यी बळी होऊ शकता. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

तुल राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आर्थिक अडचणींमुळे टीका आणि वादविवादाची परिस्थिती उद्भवेल. आपल्याकडून अतिअपेक्षा करणा-यांना नाही म्हणायची तयारी ठेवा. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड आनंदी राखतील. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज वैवाहिक आयुष्यात एक छान डिनर आणि मस्त झोप मिळणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमच्या प्रियकर/प्रेयसीशी असलेले नातेसंबंध आज गैरसमजूतीमुळे दुरावतील. प्रेम करणे हा नाजूक व्यवहार आहे हे तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे प्रिय व्यक्तीला गृहित धरू नका. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. वैवाहिक आयुष्याची नकारात्मक बाजू आज कदाचित तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे.

धनु राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

मकर राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.

कुम्भ राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमचा/तुमची जोडीदार सॅकेरिनपेक्षाही गोड आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मीन राशी भविष्य (Saturday, May 26, 2018)

तुमच्या समस्यांमुळे तुमचा मानसिक आनंद आज दुरावेल. हुशारीने गुंतवणूक करा. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील, प्रेरित होतील. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top