Connect with us

सोमवार 23 जुलै : या 6 राशींचे उघडणार नशिबाचे दार, पहा तुमच्या राशीचा आहे का समावेश

Today's Horoscope

सोमवार 23 जुलै : या 6 राशींचे उघडणार नशिबाचे दार, पहा तुमच्या राशीचा आहे का समावेश

आज सोमवार 23 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. चढउतारांमुळे फायदा होईल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

वृषभ राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

आपल्या वागण्या-बोलण्यात भावनांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमच्या वागण्या-बोलण्याबाबत तुमच्या आजुबाजूचे लोक साशंक असतील. तुम्हाला त्वरित निर्णय हवे असल्यामुळे नैराश्य लगेच ताबा घेईल. गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळित असणार नाही. जुजबी मतभेद झाल्याने प्रणयराधनाचा योग नाही. तुमच्या अवतीभवती असलेल्या महत्त्वाचे निर्णय घेणाºया लोकांना तुमची मते सांगा त्याचा तुम्हाला फायदा होईल – तुमची कामातील हातोटी, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे तुमचे कौतुक होईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आजचा दिवस कठीण असणार आहे; पण संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल.

मिथुन राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

आज शांत राहा-तणावमुक्त राहाल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

कर्क राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.

सिंह राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल.

कन्या राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा शृंगार अधिक खुलतो.

तुल राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

दिवसभराच्या कामात आरोग्याच्या समस्या हस्तक्षेप करू शकतात. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा, नाही तर त्याला/तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल.

धनु राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही केलेली गणिते फलदायी ठरतील. त्यामुळे तुम्ही वेळेवर प्रकल्प पूर्ण करू शकाल. नवीन प्रकल्प हाती घेण्यासही ही योग्य वेळ आहे. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील.

मकर राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारत तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी घ्या. मग तुम्ही सहजपणे समस्या टाळू शकाल. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. जर तुम्ही आज कामाच्या ठिकाणी जास्त वेळ सोशल मीडियावर घालवलात तर तुम्ही पकडले जाऊ शकता. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. तुमच्या उधळ्या स्वभावावर तुमचे कुटुंबीय टीका करतील. भविष्यासाठी तुम्ही पैशांची बचत केली पाहिजे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कंटाळा येईल, याला कदाचित तुमचा आळशीपणा कारणीभूत असेल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे.

मीन राशी भविष्य (Monday, July 23, 2018)

तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कौटुंबिक ताणतणाव दडपण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पण अनावश्यक काळजी तुमचा मानसिक ताण वाढवले. कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने जितक्या लवकर त्यावर मार्ग काढता येईल तेवढ्या लवकर मार्ग काढा. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कामच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top