astrology

राशिभविष्य 22 में 2018 : आजचा दिवस या 5 राशीसाठी राहील फायदेशीर तर 3 राशींना होईल नुकसान

राशीभविष्य आपल्या जीवना मध्ये महत्वाचे आहे. राशी अनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याच्या निगडीत अनेक माहिती प्राप्त होऊ शकते. ग्रह गोचर आणि नक्षत्र चाल यांच्या आधारावर राशिभविष्य निर्माण होते. ग्रहांची चाल नेहमी बदलत असते. यामुळे आपल्या दैनिक जीवनात घडणाऱ्या घटना देखील एकसारख्या नसतात. आज मंगळवार 22 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. चांगले दिसण्यासाठी तुम्ही जे काही बदल कराल त्यामुळे तुमच्या कुटूंबातील सदस्य वैतागतील. अचानक ओळखीतून होणारी जवळीक टाळा, अन्यथा ती पश्चातापाला कारणीभूत ठरु शकते. तुम्ही दिवसभर कदाचित त्रासलेले असाल त्यामुळे तुमच्या कामाच्या दर्जावर त्याचा परिणाम होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील मजा निघून गेली आहे, असे तुम्हाला वाटेल, पण लवकरच सगळं काही ठीक होईल.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला दिलेली प्रत्येक सूचना तुम्ही टीका म्हणून घ्याल, जी तुमचा मूड घालवेल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. आज कुटूंबातील एखादा सदस्य तुमची चिंता वाढवेल – परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर काही मर्यादा ठरवून घ्या आणि त्यानुसार वागा. आज धन्य व्हाल व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात कठीण दिवस असण्याची शक्यता आहे. तेव्हा सतर्क राहा.

कर्क राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे.

सिंह राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला. समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

कन्या राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. तुमचे वरिष्ठ तुमचे मुद्दे आज समजून घेऊ शकत नाहीत, पण संयम ठेवा, भविष्यात त्यांना तुमचे मुद्दे पटतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

तुल राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

हृदयरोग असणाºयांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुमचा आनंदीपणा नष्ट करेल. तुमचे आरोग्य आणि उर्जा आज तुमच्या मदतीला असणार नाही, त्यामुळे मनाने खंबीर राहा. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. कामाच्या ठिकाणची परिस्थिती काहीशी विचित्र असू शकेल; सर्वजण तुमच्या विरुद्ध आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल. असे वाटत असले तरी ते खरे नाही.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. घरात काही बदल झाल्याने अथवा काही घडल्याने प्रियव्यक्तीसोबत तुम्ही अडचणीत याल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी-आवडीनिवडींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींची मदत घ्या. त्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. मेडिकल ट्रन्सक्रिप्शनमध्ये काम करणाºयांसाठी दिवस चांगला आहे. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुमचा/तुमची आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राइझ मिळेल.

धनु राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. गुंतवणूक करताना चढउतार खूप घातक ठरू शकतात – म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. मुलांसोबत तुम्हाला आज खूप कठोर वागावे लागेल. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. उद्यामशील लोकांसोबत भागीदारी कराल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

मकर राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.

मीन राशी भविष्य (Tuesday, May 22, 2018)

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. आजच्या दिवशी ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. एका मित्र/मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.


Show More

Related Articles

Back to top button