Connect with us

राशिभविष्य 21 में 2018 : भगवान शंकराच्या कृपेने या 4 राशींचे उघडेल नशीब, होतील सर्व कामे

Astrology

राशिभविष्य 21 में 2018 : भगवान शंकराच्या कृपेने या 4 राशींचे उघडेल नशीब, होतील सर्व कामे

राशीभविष्य आपल्या जीवना मध्ये महत्वाचे आहे. राशी अनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याच्या निगडीत अनेक माहिती प्राप्त होऊ शकते. ग्रह गोचर आणि नक्षत्र चाल यांच्या आधारावर राशिभविष्य निर्माण होते. ग्रहांची चाल नेहमी बदलत असते. यामुळे आपल्या दैनिक जीवनात घडणाऱ्या घटना देखील एकसारख्या नसतात. आज सोमवार 21 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. वादावादी आणि एखाद्या विषयावर एकमत न होण्यामुळे घरात तणावाचे क्षण येतील. तुमचे अनियंत्रित चंचल वागणे यामुळे प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होतील. काम करताना सोशल मीडियाचा वापर करणे तुम्हाला संकटात ़टाकू शकते. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. तुम्हाला तुमच्या जोडीदाशी असलेल्या भावनिक नात्याबद्दलच संशय निर्माण होईल, जे चुकीचे आहे.

वृषभ राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्या पेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल.

मिथुन राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे. एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं.

कर्क राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

स्वत:ची प्रगती करणा-या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करत नाहीत, असे तुम्हाला वाटू शकेल, पण संयम घालवू नका. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.

सिंह राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो, त्यामुळे काळजी घ्या. अचानक, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची उर्जा अत्यंत कमी असेल, ज्याच्यामुळे तुम्ही संकटात पडू शकता. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुम्ही कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.

कन्या राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.

तुल राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील, मात्र मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. चांगले मित्र हे अनमोल खजिना जपावे तसे असतात. तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी करणे कठीण पडेल. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा/तुमची जोडीदार दुखावल्यामुळे आज कदाचित तुमच्या नात्यात थोडेते वातावरण तंग असेल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. आर्थिक बाबी हाताळताना अधिक काळजी घेणे सावधनता बाळगणे ही काळाची गरज आहे. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.

धनु राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळित असणार नाही. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल – आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.

मकर राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित खर्चामुळे तुमचा आर्थिक ताण वाढेल. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा एखादा तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्या. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. स्वत:चेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वत:च्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील – आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका.

मीन राशी भविष्य (Monday, May 21, 2018)

खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. तुमचा द्वेष करणारी माणे आज तुम्हाला अधिक त्रासदायक भासू शकतील, ज्यामुळे तुमचा आक्रमकपणा वाढेल. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top