astrology

राशिभविष्य 18 जून 2018 : शिव शंकर आज 5 राशीवर कृपा करणार आहेत, होतील आज सर्व इच्छा पूर्ण

आज सोमवार 18 जून चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

वृषभ राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण तुमच्याकडे सल्ला मागतील. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

मिथुन राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

आज खूप श्रम करण्याचे टाळा – तुमच्या शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाली असून तुम्हाला आराम करण्याची निकड आहे. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

कर्क राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. अनावश्यक वादावादीमुळे कुटुंबात तणाव निर्माण होईल. वादावादीत जिंकलात म्हणजे विजय ख-या अर्थाने मिळाला असे नव्हे. शक्य असेल तर तर्कसुसंगत विचार करून वादावादी टाळा. तुमच्या ज्येष्ठांचे ऐका आणि तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शांतपणे विचार करा. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

सिंह राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

अध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. तुमचा प्रियकर/प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.

कन्या राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

ताणतणावावर मात करण्यासाठी शांत आराम देणारे संगीत ऐका. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. तुम्ही नेहमी ज्या व्यक्तीवर भरवसा केला ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक नाही हे समजल्यावर तुम्ही आज प्रचंड अस्वस्थ व्हाल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च अानंदाचा अनुभव घेणार आहात. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाºयांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. उत्तम अन्न, रोमँटिक क्षण; तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत.

तुल राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. सहकुंटूब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा/जोडीदार तुमच्यावर भडकेल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

तुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

धनु राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही समूहामध्ये असता तेव्हा तुम्ही काय बोलता ते नीट पाहा – तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होईल. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. काम करताना सोशल मीडियाचा वापर करणे तुम्हाला संकटात ़टाकू शकते. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आजचा दिवस खूप रोमँटिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल.

मकर राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

कुम्भ राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. जवळच्या नातेवाईकांची, त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. तुमच्या लहरी स्वभावाला आवर घाला, अन्यथा तुमची मैत्री तूटू शकते. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रीत करा. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुम्ही बराच काळ तुमच्या जोडीदाराला काही सरप्राइझ दिले नाहीत तर लग्न हा एक त्रास होण्याची शक्यता असते.

मीन राशी भविष्य (Monday, June 18, 2018)

येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. आज तुमची कामाच्या ठिकाणची यंत्रणा काहीशी बिगडलेली असू शकते. हा कदाचित तुमचा भासही असेल, त्यामुळे तज्ज्ञांना बोलावण्याआधी वीजेचा पुरवठा आणि इतर मूलभूत गोष्टी तपासून घ्या. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमचा/तुमची तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल.


Show More

Related Articles

Back to top button