astrology

राशिभविष्य 16 में 2018 : लक्ष्मीची कृपा राहील या 4 राशींवर होईल मनातील इच्छा पूर्ण, वाचा राशिभविष्य

राशीभविष्य आपल्या जीवना मध्ये महत्वाचे आहे. राशी अनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याच्या निगडीत अनेक माहिती प्राप्त होऊ शकते. ग्रह गोचर आणि नक्षत्र चाल यांच्या आधारावर राशिभविष्य निर्माण होते. ग्रहांची चाल नेहमी बदलत असते. यामुळे आपल्या दैनिक जीवनात घडणाऱ्या घटना देखील एकसारख्या नसतात. आज बुधवार 16 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष

या सप्ताहात नोकरीत ताण-तणावाचे प्रसंग उद्भवतील. उधार-उसनवार देणे या सप्ताहात शक्मयतो टाळा. कोर्ट-कचेऱयांची कामे तूर्तास पुढे ढकला. महिलांनी देवीचीउपासना करावी मनासारख्या काही गोष्टी घडतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी कळेल. वडिलधाऱया माणसांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

वृषभ

शत्रूंच्या कारवाया सुरू होतील. पण त्याकडे लक्ष न देणे योग्य ठरेल. या आठवडय़ात पोटाच्या विकारापासून आजार उद्भवतील. घरातील नको असलेली अडगळ दूर करा तसेच महत्वाची कागदपत्रे जपून ठेवा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. नोकरांचे व कनि÷ वर्गाचे साहाय्य आपणास मिळेल. आर्थिकस्थिती उत्तम राहील. पण तितकाच खर्चही वाढेल. काही कारणाने निर्माण झालेले गैरसमज दूर होतील.

मिथुन

संततीच्या विवाहाच्या बाबतीत काळजी, चिंता वाढू लागेल. पण योग्य ठिकाणी विचार करूनच विवाहाचा निर्णय घ्या. विचित्र स्वप्ने पडणे यामुळे मानसिक अस्वास्थ्य बिघडेल. वाणीमध्ये गोडवा निर्माण करा अनेक कामे साध्य करू शकाल. खांदे दुखणे, पित्त वाढणे अशापासून काळजी घ्या. हातात सतत कोठून का कोठून पैसा हाती खेळत राहील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी साधून येईल.

कर्क

काळ वेळ आणि संधी कुणाची वाट पहात नसतात त्यामुळे नोकरी-व्यवसाय अथवा विवाहासाठी चांगले स्थळ आल्यास ते नाकारू नका. नोकरी हंगामी असेल तर त्यात मुदतवाढ मिळेल. शिक्षणासाठी योग्य कोर्स निवडा. प्लॉट जमीन, दुकान, कॉम्प्लेक्स वगैरे खरेदी विक्रीसाठी चांगले योग आहेत. नोकरवर्गास अनुकूल काळ. आर्थिकस्थिती उत्तम राहील.

सिंह

नोकरीत समझोत्याने वागा कुठल्याही अमूक करीन तमूक देईन असे चुकूनही सांगू नका. काही प्रसंग अथवा अडीअडचणीमुळे ते पाळणे शक्मय होणार नाही. संतती नसणाऱयांना आशादायक वातावरण, महत्वाची कामे असतील असे वाटत असेल तर अनुभविकांचा सल्ला घ्या. ते फायदेशीर ठरेल. प्रकृती नरमगरम राहील. शेअरमार्केटचा व्यवसाय असेल तर सावध रहा.

कन्या

पाण्यात मासा कसा झोपत असेल त्यालाच माहीत अशी तुमची स्थिती आहे. कामाचा ताण वाढणार आहे. त्याप्रमाणात पैसाही बऱयापैकी मिळेल. शिक्षणात उत्तम यश. सर्व जबाबदाऱया एकाचवेळी पडल्याने घरातील कुरबुरी वाढतील. भावंडे व शेजारी तसेच नातेवाईकांशी वादविवाद करू नका. तसेच काही बाबतीत गुप्तता पाळा पुढे त्याचा फायदा होईल.

तूळ

‘धनी तेरा रंग कैसा जेसा मिलावे तैसा’ अशी म्हण आहे. या सप्ताहात चित्रविचित्र स्वभावाच्या व्यक्ती भेटतील. त्यांच्याशी वागताना जरा विचार करावा लागेल. नोकरी, उद्योग व्यवसाय नीट चालेल. नवीन कामाची कंत्राटे मिळतील, मित्रमैत्रिणीबरोबर सहलीला जाण्याचे योग येतील. जे काम हाती घ्याल ते यशस्वी कराल. कौटुंबिक जीवनात जरा नरमगरम वातावरण राहील.

वृश्चिक

व्यापार उद्योगाच्या बाबतीत अनुकूल परिस्थिती आहे. आर्थिक व जमिनीच्या व्यवहारात काही लचांडे निर्माण होतील. नोकरचाकरांचे मन दुखवू नका. नवीन गाडी घेणार असाल तर चांगला योग आहे. वैवाहिक बाबतीत काही निर्णय दोघांच्या विचारांनेच घ्यावे लागतील. लॉटरी, सट्टा, मटका वगैरेत फारसा लाभ होणार नाही. मोठी गुंतवणूक टाळा.

धनु

गुरु लाभात आहे. पैसा बऱयापैकी मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुणी जर एखादी चांगली वस्तू भेट दिल्यास ती लाभेल. अपरिचित व्यक्तींना घरात थारा देऊ नका. नको त्या भानगडी निर्माण होतील. व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्मयता. सावधान राहणे आवश्यक. देवधर्माकडे विशेष लक्ष द्या. मन शांत राहील.

मकर

घरबांधणीत अडथळे येतील. लोकांच्या नजरेत भरेल असे काहीही करू नका. तुमचे गुण चांगले असतील पण एखादी चूक देखील साऱया प्रयत्नावर पाणी फिरवू शकेल. कोर्टमॅटर चालू असेल तर पुढील तारखा घ्या. एखाद्या मित्राच्या मदतीने स्वतःला अथवा मुलांना नोकरी मिळण्याची शक्मयता. इंजिनिअर, वकील यांना चांगला काळ. नव्या क्षेत्रात प्रवेश कराल.

कुंभ

गोरक्षनाथांची कृपा राहणार आहेत. नवनाथ चरित्र वाचन चालू ठेवा. अडचणीतून मार्ग निघेल. अनेक अशक्मयप्राय गोष्टी साध्य होतील. निवडणूक काळात झालेल्या काही चुका सूडाचे राजकारण निर्माण करतील. आर्थिक समस्या सुटतील. किमती वस्तुंची खरेदी होईल. लग्न जमत नसेल तर ते जुळेल स्थळ चांगले मिळेल.

मीन

एखादे मोठे काम मिळाले अथवा लग्नासाठी चांगली ऑफर आली तर ती लाथाडू नका. भावी जीवनात काही चांगल्या घटना घडतील. वृद्धांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रमोशन, अपेक्षित जागी बदली, परदेश प्रवास या स्वरूपात त्याचे फळ मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.


Show More

Related Articles

Back to top button