Breaking News

आपल्या राशी अनुसार शनीदेवा चे उपाय केल्याने दूर होतील शनी दोष…

ज्योतिषशास्त्रा मध्ये शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात शनिदेव आपल्या कर्मांनुसार फळ देतात. शनीची दशा ज्या व्यक्तीवर असते त्याला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

शनी दोषामुळे कामामध्ये अडचणी येऊ लागतात, आज येथे राशी नुसार शनी उपाय सांगितले आहेत ज्यांना केल्याने शनी दोष दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊ या बद्दल अधिक माहिती.

राशीनुसार करावयाचे उपाय जाणून घ्या-

मेष – शनिवारच्या दिवशी मीठ आणि तेल दान केल्याने मेष राशीच्या लोकांना लाभ प्राप्त होतो.

वृषभ – या राशीचे लोक शनिवारी हरभरा (चणे) आणि गूळ दान करू शकतात.

मिथुन – शनिवारी अन्न व कपड्यांचे दान करणे मिथुन राशीच्या लोकांसाठी फायद्याचे राहील.

कर्क – या राशीच्या लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार गौशाळेत दान केले पाहिजे.

सिंह – या राशीच्या लोकांनी शनिवारी पक्षांना दाणे खाण्यास दिले पाहिजेत.

कन्या – कन्या राशीच्या लोकांनी शनिवारच्या दिवशी उडद दान केली पाहिजे.

तुला – या राशीच्या लोकांनी शनिवारच्या दिवशी शनी मंदिरामध्ये तेल दान केले पाहिजे.

वृश्चिक – वृश्चिक राशीचे लोक पक्षांना दाणे खाण्यास देऊ शकतात आणि गरजू लोकांना मदत करू शकतात.

धनु – शनिवारी आपल्या क्षमतेच्या अनुसार एखाद्या आश्रमात दान केले पाहिजे.

मकर – या राशीच्या लोकांनी शनिवारी पीठाच्या गोळ्या माश्यांना खाण्यास द्यावे.

कुंभ – या राशीच्या लोकांनी शनिवारी मंदिरात तेल दान करावे.

मीन – या राशीचे लोक शनिवारच्या दिवशी कोणत्याही गौशाळेत धन आणि अन्नदान करू शकतात किंवा गरजू लोकांना मदत करू शकतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.