आज 6 राशीच्या करियर मध्ये येत असलेले अडथळे होणार दूर, घरा मध्ये येईल सकारात्मक ऊर्जा

आम्ही आपल्याला बुधवार 23 ऑक्टोबर चे राशीभविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा rashi bhavishya 23 October 2019.

मेष राशी: Rashi Bhavishya

गर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.

वृषभ राशी: Rashi Bhavishya

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. उद्यामशील लोकांसोबत भागीदारी कराल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.

मिथुन राशी: Rashi Bhavishya

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. कामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.

कर्क राशी: Rashi Bhavishya

आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

सिंह राशी: Rashi Bhavishya

अतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. वीज खंडीत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मदतीला येईल.

कन्या राशी: Rashi Bhavishya

एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.

तुला राशी: Rashi Bhavishya

तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

वृश्चिक राशी: Rashi Bhavishya

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल.

धनु राशी: Rashi Bhavishya

आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. खाजगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा. नवीन संकल्पना देण्याबरोरच व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल.

मकर राशी: Rashi Bhavishya

आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल.

कुंभ राशी: Rashi Bhavishya

यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधन करण्याचे विचार घोळतील. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

मीन राशी: Rashi Bhavishya

तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. आज तुम्ही सहजपणे समस्यांवर मात कराल आणि विजेते ठराल. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 23 October 2019 वाचले. आपल्याला rashi bhavishya 23 October 2019 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 23 October 2019 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.